Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योग प्राणायामच्या स्वरूपात आरोग्याचा संजीवनी मंत्र दिला ---प्रवीण माने


 

सहसंपादक- डॉ-संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9922419159

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योग, प्राणायाम च्या स्वरूपात आरोग्याचा संजीवनी मंत्र दिला. त्यामुळे भारतीय योग संपूर्ण जगाला वरदान ठरला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांनी केले.  

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त इंदापूर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरण गानबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सेवा पंधरवडा कार्यक्रमात . माने बोलत होते. यानिमित्त इंदापूर जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ च्या प्रांगणात मोफत योग शिबिर संपन्न झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी पहाटे ५ ते ७ च्या दरम्यान यज्ञ करून अभिष्टचिंतन करण्यात आले. 

यावेळी योगगुरु प्रशांत गिड्डे, मल्हारी घाडगे, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा मार्गदर्शक प्रविण माने, भाजपा तालुकाध्यक्ष राम आसबे, शहराध्यक्ष किरण गानबोटे, ॲड. मयूर शिंदे, सरचिटणीस श्रीनिवास सातपुते, नवनाथ शिंदे, परमेश्वर माने, हर्षवर्धन कांबळे, शितलताई साबळे, महिला शहराध्यक्षा सौ. माधुरीताई भराडे, सलमा खान तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पतंजली योग समितीचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सेवा पंधरवडा कार्यक्रमा अंतर्गत इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शेकडो रुग्णांची नेत्र तपासणी करून काहींना चष्मे वाटप करण्यात आले तर काहींची नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड झाली. यावेळी रुग्णांना फळे वाटप देखील करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली, सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, नेत्र तंत्रज्ञ विशाल कलंत्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मयूर शिंदे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक इंदापूर शहर मंडल सरचिटणीस श्रीनिवास सातपुते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हर्षवर्धन कांबळे, गणेश पांढरे, परमेश्वर माने, सोमनाथ ठवरे, सोमनाथ शिंदे, गणेश देवकर, सूरज बनसोडे, कुणाल, राजेंद्र सातपुते यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा