Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

आयपीएस अंजना कृष्णा यांच्या समर्थनात आंदोलने करणारे "अतुल खूपसे पाटील "यांच्यावर गुन्हे दाखल


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

दि. 05/09/2025 रोजी दुपारी 15.25 वा ते दि. 5/09/2025 15.30 वा च्या दरम्यान रोजी पर्यंत मौजे देवीचा माळ, कमलाभवानी मंदिरासमोर ता करमाळा येथे आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या समर्थनात जमाबंदी असताना दुग्धाभिषेक करून आंदोलन केल्याप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांच्या सह अकरा जणांवर गुन्हे दाखल झाले असून फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल 744 गणेश सुभाष दळवी पोलीस ठाणे करमाळा यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) अतुल खूपसे पाटील राहणार उपळवाटे तालुका माढा जिल्हा सोलापूर २) गणेश भानवसे ३) बालाजी तरंगे ४) ईश्वर बापू शिंदे राहणार खांबेवाडी तालुका करमाळा ५) काका दरगुडे ६) वैभव मस्के ७) निलेश पवार ८) साहेबराव विटकर ९) हनुमंत कानतोडे १०) सागर महाराज ११) शरद पूर्ण नाव माहित नाही इत्यादींवर करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 736/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून



या बाबत हकिकत अशी की, दि. 05/09/2025 रोजी दुपारी 15.20 वाचे दरम्यान मोजे देवीचा माळ करमाळा येथील कमलाभवानी मंदिरा समोर वरील लोकानी मा. Ips अंजना कृष्णा व्हीएस उपविभागीय अधिकारी करमाळा सोलापूर ग्रामीण या कुर्डू ता. माढा जि सोलापूर येथे बेकायदेशीर अवैध्य मुरूम उपसा करीत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्याकरता गेले असता त्या ठिकाणी माननीय नामदार अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तेथील लोकांनी फोन करून बोलण्यास देऊन सदर कॉल चे रेकॉर्ड करून जनमानसात अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन केली या घटनेच्या निषेधार्थ मा.जिल्हाअधिकारी सो सोलापूर यांचा जमाव बंदी आदेश असताना जमाव बंदी आदेशाचा भंग करून गैर कायद्याचे मंडळी जमवून मा. Ips अंजना व्ही.एस. उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग सोलापूर ग्रामीण यांचे पोस्टर वरील फोटोस दूग्धाअभिषेक केला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा