Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

लुमेवाडी (ता. इंदापूर, जिल्हा पुणे) येथील हजरत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी (र्.अ) यांच्या ३२ व्या उरूस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

-----लुमेवाडी (ता. इंदापूर, जिल्हा पुणे) येथील हजरत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी (र्.अ) यांच्या ३२ व्या उरूस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती दर्गाह ट्रस्टी व ग्रामपंचायत लुमेवाडी यांनी दिली. 

      सदरचा कार्यक्रमास आवाटी (ता. करमाळा) येथील वली सोफी हजरत चांदपाशा कलंदरी, अंबाजोगाई मोमीनाबाद येथील हजरत सोफी आरिफबाबा, राजस्थान येथील हजरत बाबजी साहब (छोटे बाबजी) आवाटी येथील सज्जादा नसेल सोफी हसनैन कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

    उरूस निमित्त शनिवार दि १३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री नऊ वाजता संदलचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी काझी मोहल्ला येथून सायंकाळी सहा वाजता संदलची मिरवणूक निघणार असून ती मिरवणूक काझी गल्ली, विठ्ठल मंदिर, दत्त चौक, जुने ग्रामपंचायत कार्यालय, बागवान गल्ली, आंबेडकर चौक, जुने एसटी स्टँड, जुने पोलीस स्टेशन, विजय चौकात आल्यानंतर दर्गा मशिदीमध्ये महाप्रसादाचे वाटप होवून संदल लुमेवाडीकडे मार्गस्थ होणार आहे. याबरोबर हाजी हाफिज सहाब यांचे हजारो अनुयायी लुमेवाडीकडे सदरच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत.



    रविवार दि १४ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्य उरूस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पुणे, मुंबई, विटा, मायणी, कराड, सांगली, सातारा, सांगोला, पंढरपूरसह इंदापूर, अकलूज आदि राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येणार आहेत. सायंकाळी आठ वाजता दिल्ली येथील कव्वाल टीव्ही स्टार वारिस साबरी आणि मुंबई येथील अजीज नाजा यांचे सुपुत्र कव्वाल अदनांन नाजा यांच्यात कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे. उरूस निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

     दर्गाह वरती डेकोरेशन लाइटिंग विजापूर कर्नाटक येथील सादिक भाई उर्फ अद्दिशाह दर्गा यांचे असून साऊंड सिस्टिम अकलूज येथील पांडे यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच विशेष सहकार्य अफजल मुलांनी दिघंची व लुमेवाडी ग्रामपंचायत यांचे लाभले आहे. 

      तरी उरूस निमित्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा तसेच संदल उरुस कव्वालीचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गाह ट्रस्टी सुफी हाजी हाफीज फतेह मोहम्मद जोधपुरी दर्गाह व मुस्लिम जमात लुमेवाडी यांनी केले आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा