*मुख्य संपादक हुसेन मुलाणी--टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
तु आमच्या भागात का आलास म्हणून काठीने लाथा बुक्क्यांनी डोक्यात पाठीवर तोंडावर बर गाडीवर गुप्त भागावर व शरीरावर इतर ठिकाणी मारहाण केल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्याबाबत कांताबाई अभिमान चौगुले यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात समक्ष दिलेला जवाब आणि पोलीसा कडून मिळालेली माहितीपुढीलप्रमाणे
मी कांताबाई अभिमान चौगुले वय 35 वर्षे व्यवसाय घरकाम रा. घाटशिळ रोड, पाण्याच्या टाकीजवळ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव मो.नं. 7499883682 (जात- हिंदू वडार)
समक्ष पोलीस ठाणे हजर येवून जबाब देतो की, मी वरील ठिकाणची राहणारी असून कुटुंबासह राहते व आमचे शेजारीस माझी आत्या नामे काशीबाई त्याचा मुलगा राजेश ची पत्नी नंदिनी, राजेश ची मावशी लक्ष्मी हे पण त्याचे कुटुंबासह आमचे घरा शेजारी राहतात. आत्याचा मुलगा राजेश श्रीमंत पवार वय 32 वर्षे हा लहान पणापासूनच मुकबधीर आहे.
दिनांक 22/12/2025 रोजी संध्याकाळी अंदाजे साडेसहा वाजणेच्या दरम्यान मला आत्याचा मुलगा विजय श्रीमंत पवार यांनी फोनवरून कळविले की, मी तुळजापूर च्या बाहेर असून माझा मोठा भाऊ नामे राजेश यास जगदाळे कॉम्पलेक्स पार्किंग मलबा हॉस्पिटल समोर तुळजापूर येथे काही लोक मारहान करीत आहेत. अशी माहिती मिळाली आहे तरी तुम्ही तेथे तात्काळ जावा असे कळविल्याने मी माझे सोबत राजेशची पत्नी नंदिनी, आई काशीबाई, मावशी लक्ष्मी असे जगदाळे कॉम्पलेक्स पार्किंग मलबा हॉस्पिटल समोर तुळजापूर येथे अंदाजे
3संध्याकाळी सात वा. सुमारास गेलो असता माझ्या आत्याचा मुलगा नामे राजेश श्रीमंत पवार यास तु आमच्या भागात का आलास म्हणून तेथील काही लोक मारहान करीत होते. राजेशचे दोन्ही हात बांधलेले होते. व त्यास डोक्याला. पाटीवर, तोंडावर, बरगडीवर व गुप्त भागावर मारहान करीत असलेले दिसत होते. आम्ही त्यांना सोडवण्यास गेलो असता त्यांनी मला व माझ्या सोबत असलेल्या सर्वांना शिवीगाळ करून, धक्काबुक्की केली. व पुन्हा जर आमच्या भागात हा दिसला तर त्याला जिवेच मारू अशी धमकी दिली. माझा आत्याचा मुकबधीर मुलगा राजेश श्रीमंत पवार वय 32 वर्षे रा. घाटशिळ रोड पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर यास मारहान करून, जखमी जखमी करणारे लोकांचे
नावाची खात्री केली असता 1) सुरज हरिश्चंद्र जगदाळे (2) प्रतिक जगदाळे 3) गणेश जगदाळे 4) राजाभाऊ देशमाने
5) शंतनू नरवडे व इतर सर्व राहणार तुळजापूर खुर्द असे असल्याचे खात्रीशिर समजले. त्यानंतर आम्ही आत्याचा मुलगा राजेश यास पाहिले असता त्याचे डोक्यात पाटीवर, तोंडावर, गडावर, बरगडीवर, गुप्त भागावर व शरीरावर इतर ठिकाणी काठीने मारहान झाल्यामुळे पुर्ण शरीरावर काळे निळे वळ दिसत होते. आम्ही त्यास घेवून पोलीस स्टेशन तुळजापूर येथे आलो असता तेथे आत्याचा मुलगा राजेश यास जास्तच त्रास होवू लागल्याने पोलीसांनी उपचारासाठी मेडीकल यादी देवून उपचारासाठी सरकारी दवाखाना तुळजापूर येथे पाठविले असून सध्या त्याचेवर दवाखान्यात उपचार चालू आहेत
तरी दिनांक 22/12/2025 रोजी सायंकाळी 07:00 वा. सु. जगदाळे कॉम्पलेक्स पार्किंग मलबा हॉस्पिटल समोर तुळजापूर येथे माझा आत्याचा मुकबधीर मुलगा राजेश श्रीमंत पवार वय 32 वर्षे रा. घाटशिळ रोड पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर यास 1) सुरज हरिश्चंद्र जगदाळे 2) प्रतिक जगदाळे 3) गणेश जगदाळे 4) राजाभाऊ देशमाने 5) शंतनू नरवडे व इतर सर्व राहणार तुळजापूर खुर्द यांनी तु आमच्या भागात का आलास म्हणून काठीने, लाथाबुक्याने, डोक्यात पाटीवर, तोंडावर, बरगडीवर, गुप्त भागावर व शरीरावर इतर ठिकाणी व मला माझ्या सोबत असलेली राजेशची पत्नी नंदिनी, आई काशीबाई, मावशी लक्ष्मी यांना पण शिवीगाळ करून धक्काबुक्की करणारे वरील लोकांवर कायदेशिर कारवाई होणेस विनंती आहे.
माझा वरील जबाब माझे सांगणेप्रमाणे सांगणकावर टंकलिखीत केला असून तो मला वाचून दाखविला तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे.
सदर प्रकरणी
१)सुरज हरिश्चंद्र जगदाळे २) प्रतीक जगदाळे ३) गणेश जगदाळे ४) राजाभाऊ देशमाने ५) शंतनू नरवडे व इतर हे सर्व राहणार तुळजापूर खुर्द तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र भारत. यांच्यावर
भारतीय न्याय संहिता (बी एन एस)-११८(१)/ ११५(२) आणि/ १९०/ १९१(२)/ १९१(३)/. अपंग व्यक्ती चे अधिकार अधिनियम २०१६ (९२) प्रमाणे तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे
याप्रकरणी पुढील तपास पोलीस इन्स्पेक्टर नामदेव शिवाजीराव मड्डे हे करत आहे






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा