Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

धाराशिव( उस्मानाबाद) जिल्ह्यातील धाडसी पत्रकार- हुकूमत मुलाणी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

धाराशिव : धाराशिव (उस्मानाबाद) येथील टुडे समाचार या न्यूज चॅनेल चे

संपादक तथा पत्रकार हुकूमत मुलांनी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांनी विविध वृत्तपत्रात काम करून आपले नाव लौकिक केले होते धाराशिव जिल्ह्यात एक धाडसी आणि न्याय मिळवून देणारा म्हणून त्यांची ख्याती होती त्यांच्या अकाली निधनाने धाराशिव जिल्ह्याने एक धडाडीचा पत्रकार हरवला असून त्यांनी टुडे समाचार या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रश्नावर वार्तांकन करून अनेकांना न्याय मिळवून दिला होता त्यांनी पत्रकारी क्षेत्रामध्ये आपले उच्च स्थान निर्माण केले होते. त्यांचा अंत्यविधी मूळ गावी धाराशिव तालुक्यातील कोंड येथील दफनभूमीत सायंकाळी चार वाजता होणार आहेत. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


*टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज- चे संपादक हुसेन मुलाणी आणि टाइम्स 45 न्यूज परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली*🙏🤲🤲🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा