Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

देशाच्या विकासामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचा सिंहाचा वाटा असून प्रत्येकाने विमा पॉलिसी करणे काळाची गरज --पोलीस उप अधीक्षक, संतोष वाळके..


 

ज्येष्ठ पत्रकार- एम एम शेख

अकलूज--मो:-7588 164 786

" एलआयसी"ही भारत सरकारची एकमेव सरकारी विमा कंपनी असुन देशाच्या विकासामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचा सिहांचा वाटा आहे. त्यामुळेच संपूर्ण जगात एलआयसी ची मोठी ख्याती व विश्वासार्हता आहे. प्रत्येकाने विमा पाॕलिसी करने हि काळाची गरज आहे. " असे प्रतिपादन पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांनी व्यक्त केले. 

  अकलूज मध्ये एलआयसी च्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी अकलूज विभागाचे पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके आपल्या शुभेच्छापर भाषणात बोलत होते. ते पुढे म्हणाले की आज जगात खुप विमा कंपन्या आहेत. परंतु एलआयसी ची बरोबरी कोणीच करु शकत नाही. विमापाॕलिसी ही तुम्हाला आणि तुमच्या कुठुंबाला आर्थिक संरक्षण देते. पाॕलिसीधारकांचे आर्थिक उद्दिष्ट पुर्ण करुन त्यांची स्वप्ने साकार करण्यास मदत करते. तसेच केवळ जीवन विम्याचे संरक्षण नाही तर त्यांची बचत करून आर्थिक नियोजन आणि निश्चित परताव्याचे अनेक फायदे एकत्र मिळवून देते. त्यासाठी विमा धारकाने याचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी श्रीगणेश प्रतिमा पूजन, दिपप्रज्वलनाने व एलआयसी निगम गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी आयडीबीआय बॕकेचे ब्रंच मॕनेजर राकेशकुमार अगस्ती , प्रशासकीय अधिकारी संजय खंदारकर, विकास अधिकारी शंशिकांत निकम, अमोल काळे, संदेश मोहिते तसेच क्लीया अधिकारी मोहनराव लोंढे, शंकरराव बागडे, धनंजय शिंदे-पाटील, विमाप्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र आसबे तसेच तालुक्यातील सर्व विमा प्रतिनिधी व पाॕलिसीधारक यावेळी उपस्थित होते.



    प्रांरभी अकलूज ब्रँच चे शाखाधिकारी विजय अनोकार यांनी सगळ्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल काळे यांनी केले.

 तसेच यावेळी अकलूज शाखा व अकलूज एलआयसी एजंट संघटनेच्या वतीने भव्यरक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये एलआयसी चे अधिकारी , विमाप्रतिनिधी , पाॕलिसीधारकांसह ७१ जणांनी आपले पवित्र रक्तदान करुन सहभाग घेतला.



 सर्व रक्तदात्यांना सोलापूर येथील अक्षय ब्लड बँक च्या वतीने योग्य सुविधा पुरवण्यात आले होते त्यांना ब्लड बँकेच्या वतीने प्रशस्तीपत्रक देवून सन्मानीत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा