निमगाव ( म)---प्रतिनिधी रामचंद्र--मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
निमगाव (म ) ता. माळशिरस येथे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल जल्लोष करण्यात आला
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी गरजंवत मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्या साठी हैद्राबाद सातारा व औंध गॅझेट लागु करावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर पोषण बसले होते याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल निमगाव येथील ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने छञपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले या वेळी तोफा फटाकट्या यांची आतिषबाजी करून हालगीच्या निनादात गावभर साखर पेठे वाटण्यात आले गावातून मिरवणूक काढली मारुतीच्या मंदिरात जे तरूण आझाद मैदानावर अंदोलनात सहभागी झाले त्यांचा सन्मान करण्यात आला सर्व ग्रामस्थांना जेवण्याची नियोजन करण्यात येणार या वेळी ग्रामस्थ व सकल मराठा समाजातील तरूण उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा