इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर येथे राज्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हा परीषदेच्या १११ विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप, करण्यात आले असून प्रशासनाचा सायकल बँक लोकार्पण उपक्रम स्तुत्य असल्याचे मत मंत्री दत्तात्रय भरणे. मंत्री भरणे यांनी व्यक्त केले यावेळी इंदापूर शहरात त्यांनी सायकलवरून फेरफटका मारत नागरिकांशी सुसंवाद. साधला
ग्रामीण भागात प्रचंड गुणवत्ता आहे मात्र शाळांमध्ये जाण्यासाठी अनेक विद्यार्थिनींना रोज लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांची शालेय हजेरी कमी होऊन शिक्षणात देखील अडथळे निर्माण होतात. या समस्येवर मात करून मुलींच्या शिक्षणात गती यावी, त्यांची शाळेत नियमित उपस्थिती वाढावी तसेच त्यांचा प्रवासाचा त्रास देखील कमी व्हावा, यासाठी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर यांचा 'सायकल बँक' हा अभिनव उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे सावित्री च्या लेकी शैक्षणिक गरुडभरारी घेतील असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
इंदापूर पंचायत समिती प्रांगणात लोकार्पण सोहळ्या अंतर्गत १११ मुलींना सायकल बँक उपक्रमा अंतर्गत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सायकल प्रदान सोहळा संपन्न झाला. इंदापूर तालुक्या तील पाचवी ते सातवीच्या वर्गातील १११ विद्यार्थिनींना या अभिनव उपक्रमाचा लाभ झाला.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर पंचायत समिती प्रशासन सर्व विभाग प्रमुख अधिकारी,
कर्मचारी यांच्या सहकार्यातून हा आदर्श उपक्रम संपन्न होत आहे. या उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी यांनी ७२ सायकल, पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाने १०, शिक्षण विभागाने ५, विस्तार अधिकारी यांनी ७, आरोग्य विभागाने ५, सर्व अधिकारी ३, उमेद टीम ५, एकात्मीक बाल विकास प्रशासन ४ अशा एकूण १११ सायकली इंदापूर पंचायत समितीच्या सायकल बँकेत जमा करून त्यांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ‘सायकल बँक’ ही योजना मुलींच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारी आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाणे सोपे होईल, प्रवासाचा त्रास कमी होईल आणि नियमित हजेरीत वाढ होईल. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कोणतीही मुलगी मागे राहू नये, यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. यातून पुढे विविध क्षेत्रात मुली सर्वांगीण प्रगती करून आपले नाव
कोरतील. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये हा आदर्श उपक्रम राबविण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही मंत्री भरणे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर,
तहसिलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, सचिन सपकळ यांच्या सह पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायकल बँक लोकार्पण सोहळा संपन्न झाल्या नंतर मंत्री भरणे यांना सायकल चालविण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी स्वत: सायकल चालवत इंदापूर शहरातील जुना पुणे- सोलापूर हायवे रोड मार्गे शहरातून फेरफटका मारला. यावेळी तहसिलदार जिवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नायब तहसिलदार अविनाश डोईफोडे, नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्यासह सायकल मिळालेले विद्यार्थीनीं सहभागी झाले होते. यावेळी या सायकल फेरीतून मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकल चालवा असा संदेश देण्यात आला.
*पत्रकार बंधुनी अर्थाचा अनर्थ काढू नये :
कृषि मंत्रीपद स्विकारल्यानंतर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरात केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. त्याच्या बातम्या प्रसार माध्यमात प्रसारित झाल्या होत्या, त्यावर भाष्य करताना मंत्री भरणे म्हणाले, आपले बोलणे मनापासून असते. पत्रकारांनी सर्व भाषण प्रथम ऐकावे. त्यांनी अर्थाचा अनर्थ करू नये. भाषणात मी चुकलो असेल तर पत्रकारांनी मला शंभर टक्के धरावे, तो तुमचा अधिकार आहे. माझ्या भाषणाचा उद्देश तुम्ही बघा, तुम्ही लोकांनी त्या दिवशीच्या भाषणाचा अर्थ काढून दाखवला तर बरे होईल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे शेवटी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा