कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- घरोघरी जेष्ठा व कनिष्ठा गौरींचे आगमन उत्साहात झाले. आज त्यांना मिष्ठान्न भोजन करून नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानिमित्त महिलांनी सकाळ पासूनच गौरीच्या प्रतिष्ठापने निमित्त मोठा उत्साहात घरोघरी जाऊन हळदी कुंकू लावून पुजा केली.
काल अनेक महिलांनी आयता छत आणला तर इतर महिलांनी घरातील साड्या, फेटे बांधून मखर उभारला आहे. त्यामध्ये काच, प्लास्टिक, रबराची खेळने ठेवून सजावट केली. तसेच जिलाबी, लाडू, शेव, चिवडा, काटीशेव, करंजे, धपाटे, पोळ्या आदि मिष्ठान्न भोजन व खाण्याचे पदार्थ तयार करून समोर ठेवण्यात आले. काल आगमन, आज जेवण व विश्रांती तर उद्या त्यांना निरोप देण्यात येतो. त्यानिमित्त आज घरोघरी महिलांना मिष्ठान्न भोजणासाठी व हळदी कुंकू लावून पुजा करण्यात आली. त्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.
फोटो - गणेशवाडी येथील सौ. संगिता नंदकुमार शिंदे यांच्या कडे जेष्ठा व कनिष्ठा गौरींचे उत्साहात आगमन व प्रतिष्ठापना करण्यात आली.
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा