Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

हनुमान हायस्कूल ज्युनियर कॉलेज, जिल्हास्तरीय" आदर्श शाळा "पुरस्काराने सन्मानित


 

अकलूज--- प्रतिनिधी केदार लोहकरे

टाइम्स 45 न्यूज मराठी

शिक्षणाच्या क्षेत्रात दरवर्षी नवनवी शिखरे पादाक्रांत करीत असलेल्या तांदुळवाडी (ता.माळशिरस) येथील हनुमान हायस्कुल व ज्यु.कॉलेजला नुकतेच जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

          सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण समारंभ मोहोळ येथील स्वातंत्र्य सैनिक संदीपानदादा गायकवाड सभागृह येथे करण्यात आले.हा पुरस्कार आमदार जयंत आसगावकर (पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी मा.आमदार दत्तात्रय सावंत,गणपत मोरे (शिक्षण उपसंचालस पूणे विभाग),सुभाष माने (माजी अध्यक्ष मुख्याध्यापक संघ),तानाजी माने (अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ) हे उपस्थित होते. 

            नेहमीच नवनवीन उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या हनुमान हायस्कुलला काही महिन्यां पूर्वीच महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा,माळशिरस तालुका द्वितीय क्रमांक व दोन लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले होते.

माळशिरस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्कृष्ट व आदर्श नियोजन केल्याबद्दल या शाळेचे नुकतेच माळशिरस पंचायत समितीच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे. एकूण ३० वर्षात शिकून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणून भव्य माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या शाळेत सलग १६ वर्षे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतात.या स्पर्धेला महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून स्पर्धक हजेरी लावतात.सलग १६ वर्षे झाली ही शाळा रक्तदान शिबिराचे आयोजन करते आहे.या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होऊ शकले आहे.

            हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे विश्वस्थ मिलिंद शिंदे, शिवाजी दुधाट,दत्तात्रय उघडे, विजय पवार,अभिमान मिले, शशिकांत कदम,ज्ञानेश्वर उघडे, बाळकृष्ण कारंडे,बापूसाहेब काकडे यांनी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा