इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
लुमेवाडी ( ता.इंदापूर ) येथील लाखो हिंदू - मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेला हाजी हाफीज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा ( रहे ) यांचा उरूस हा राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
हाजी हाफीज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा ( रहे ) यांच्या ३२ व्या उरूस निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी मजारवर फुलांची चादर अर्पण करून मनोभावे प्रार्थना केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, उरूस कमिटीचे विश्वस्त व माजी सरपंच हाजी उस्मानभाई शेख यांनी प्रदीप गारटकर यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी मजारवर तसेच सभोवती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
प्रदीप गारटकर पुढे म्हणाले, या उरुसासाठी पुणे, सोलापूर, सातारा, धाराशिव तसेच संपूर्ण राज्यातून लाखो भाविक येतात. त्यामुळे लुमेवाडीचे महत्व अनन्यसाधारण आहे. याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी कवालीस उस्फुर्त दाद दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, इम्रान शेख, अहमदरजा सय्यद, वसीम शेख, रियाज बागवान, पांडुरंग जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष वसीम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा