संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ (स्वायत्त) महाविद्यालयात आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत एकूण 187 संशोधन पोस्टर्स विध्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य,इतिहास,आयुर्वेद, भूगोल,अर्थशास्त्र,मराठी, हिंदी, संगणकशास्त्र,अशा विविध विषयाच्या संबंधित नाविन्यपूर्ण कल्पना व त्या अनुषंगाने पोष्टर लावण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हटले की, आविष्कार स्पर्धेतून निर्माण होणारे संशोधन हे उद्याचे भावी यशस्वी संशोधक तयार करतील. या स्पर्धेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांनी ज्या नवनवीन संशोधन कल्पना पोष्टरच्या माध्यमातूम सादर केल्या आहेत. त्या खरोखरच संशोधनास साजेल अशा आहेत. नवीन संशोधनासाठी प्रेरित करणाऱ्या आहेत. हेच संशोधन उद्याचे यशस्वी संशोधक निर्माण करतील असा आशावाद व्यक्त करत सहभागी संशोधक विध्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक डॉ. निलेश काळे यांनी केले. या वेळी उपप्राचार्य डॉ. सुचिता दळवी यांनी विध्यार्थ्यांना शुभेच्छा देत नवनवीन संशोधन विषयाविषयी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन डॉ. शितल रणधीर यांनी मानले. यावेळी विभागप्रमुख प्राध्यापक व मोठ्या संख्येने विध्यार्थी सहभागी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा