सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी.
मो:-- 9922419159
गरीब, हुशार व गरजू विद्यार्थ्यांना गुरुवर्य शंकरराव जावडेकर ट्रस्टच्या वतीने शालेय साहित्य देऊन मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. पुस्तकांचे वाचन करून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करून जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन श्री नारायणदास रामदास शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य अरविंद गारटकर सर यांनी केले.
मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता इंदापूर तालुक्यातील कांदलगाव केंद्रातील १२ शाळेतील ५१० विद्यार्थ्यांना संत, महंत, समाजसुधारक यांच्या पुस्तकांचे वाटप करून प्रेरणा देण्यात आली. इंदापूरचे समाज सुधारक, शिक्षण पितामह, गुरुवर्य शंकरराव जावडेकर ट्रस्टच्या वतीने तसेच बंगलोर येथील विश्वस्त पद्माकर जावडेकर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना पुस्तके वितरण व खाऊ वाटप देखील करण्यात आले.
अरविंद गारटकर सर पुढे म्हणाले, ही पुस्तके इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना सहजपणे वाचता येतील अश्या स्वरूपाची आहेत. शब्दांचा टाईप मोठा असल्याने ही पुस्तके सहज विद्यार्थ्यांना वाचता येईल, डोळ्यांना त्रास होणार नाही. यामध्ये चित्रकृती युक्त अशी काही पुस्तके आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज, थोर नेते, देशभक्त, महिला शिक्षणाच्या आद्य प्रणेते सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आदर्श राजमाता जिजाऊ, थोर समाज सुधारक अहिल्यादेवी होळकर, विविध समाज सुधारक, अशा विविध पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्यामुळे पुस्तक वाचण्याचे संस्कार विद्यार्थ्यांवर होतील.
सहाय्यक लेखक महादेव चव्हाण सर म्हणाले, विद्यार्थ्यांवर सध्या मोबाईल, टी. व्ही, व्हिडिओ, इंटरनेट याचा खूप प्रभाव आहे मात्र त्याचा योग्य वापर फायदा करून देतो तर चुकीच्या वापरामुळे त्याचे व्यसन लागते. त्या पार्श्वभूमीवर पुस्तके वाटप करण्याचा ट्रस्टचा उपक्रम स्तुत्य आहे.
कांदलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळगाव या शाळेचे मुख्याध्यापक शहाजी पोफळे, उपशिक्षक तुकाराम जाधव, वैशाली बोराटे मॅडम, प्रगतशील बागायतदार भारत उंबरे, माजी प्राचार्य अरविंद गारटकर सर, सहाय्यक लेखक महादेव चव्हाण सर, भारत बोराटे सर, हनुमंत गोफणे या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कांदलगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदलगाव, कोळेकर वस्ती, गायकवाड शिद वस्ती, चोरमले वस्ती, जाधव भगत वस्ती, तोबरे वस्ती, देवकर वस्ती, महादेवनगर, शहा, सरडेवाडी, हिंगणगाव, या सर्व शाळांना पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी संबंधित शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, आप्पासाहेब जाधव सर, रामकृष्ण निंबाळकर सर, वंदना आगळे मॅडम, गीतांजली दीक्षित मॅडम, स्वाती नरोटे मॅडम, अश्विनी बादल मॅडम, पल्लवी पवार मॅडम, मैनुद्दीन मोमीन सर, गणेश मोरे सर, सुवर्णा कांबळे मॅडम, इशरत मोमीन मॅडम, शफिक शेख सर, शोभा चंदनशिवे मॅडम, ज्योती गोसावी मॅडम, मोहनलाल पवार सर, शशिकांत कावळे सर, श्रीमती पवार मॅडम, श्री. कवडे सर, श्री. तनपुरे सर, सचिन गुरव सर आश्विनी हेगडे मॅडम, स्वप्निल धस सर, माधुरी कागदे मॅडम, सुजाता मॅडम, संदीप तण्याळकर सर या मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदामध्ये पुस्तक वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा