इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव काळामध्ये बेकायदा गांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तींवर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निमसाखर (ता. इंदापूर) हद्दीत बीकेबीएन रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी शुभम वामन निगडे ( वय- २४ रा. निरवांगी ) व अक्षय बाळासाहेब कदम, ( वय- २८, रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्याच्याकडून पोलीसांनी दोन किलो गांजा जप्त केला आहे. निमसाखर गावच्या हद्दीमध्ये शुभम निगडे हा गांजा आणून विक्री करत असल्याची माहिती वालचंदनगर पोलीसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी निमसाखर गावच्या हद्दीमध्ये बीकेबीएन रस्त्यावर सापळा रचला. यावेळी कळंब बाजू कडून निमसाखर गावच्या दिशेने दुचाकीवरून गांजा घेऊन आलेल्या शुभम निगडेवर छापा टाकून पोलीसांनी थेट कारवाई केली. निगडे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अक्षय कडून गांजा विक्रीसाठी आणत असल्याचे सांगितले. पोलीसांनी दोघांना अटक केली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, उपनिरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाब पाटील, शैलेश स्वामी, गणेश काटकर, विकास निर्मळ, सचिन जमदाडे, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, किरण पेडकर यांनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा