तुळजापूर तालुका --प्रतिनिधी
चांदसाहेब शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
घरात आठरा विश्व दारिद्र्य , ज्येष्ठ वडीलधारी मंडळी अडाणी , अशिक्षित शिक्षणाचा लवलेश घरातील कुणालाही कधीही स्पर्शून गेला नाही अशा सर्वसामान्य घरात ११सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या संघर्षातून विश्व निर्माण करणाऱ्या अब्दुल मास्तर बद्दल त्यांच्या वाढदिवसानिमित्त छोटासा शब्दप्रपंच
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटकळ ता. तुळजापूर येथे हलाखीच्या परिस्थितीत घेउन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रसंगी गारेगार विकून, पोल्ट्री फार्म हाऊसवर काम करून शिक्षण पुर्ण केले व उच्च शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता गोरगरीब लेकरांना संगणक शिकवले व अनेकांना संगणकाचे ज्ञान देउन उदरनिर्वाह चालवन्यास प्रोत्साहित केले व अनेकांच्या रोजीरोटिचा प्रश्न सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न केला यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व अक्कलकोट येथिल श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वामी समर्थ यांच्या नावाने शुद्ध शाकाहारी हॉटेल स्थापून अल्प दरात रुचकर जेवणाची व्यवस्था करून तेथेही दहा ते पंधरा युवकांना रोजगार निर्मिती केली
तसेच समाजातील रंजल्या गांजल्याचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःला अर्पण करून सातत्याने होईल त्या पद्धतीने मदत करण्याचा ते कसोशीने प्रयत्न करत आहेत इटकळ येथिल एक नवा उजेड निर्माण करणाऱ्या व्यक्तीमत्वांचा उल्लेख करताना अब्दुल मास्तर यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते
अब्दुल शेख युवा मंचच्या माध्यमातुन त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाजउपयोगी कार्यक्रम घेउन अनेक सकारात्मक परिवर्तन घडवले आहेत शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामजिक न्याय अशा विविध आघाड्यांवर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अविरत झटत आहेत व एक सशक्त जनआंदोलन उभा करत आहेत
कोणताही गाजावाजा न करता कुठलीही फसवणूक न करता इटकळ येथिल प्रत्येक युवकाच्या ह्र्दयात वेगळे स्थान निर्माण करून एक सशक्त युवा नेतृत्व म्हणून उभारी घेत आहेत त्यांचे तारुण्य केवळ वयाचे नाही तर विचारांचे, कृतीचे आणि उद्दिष्टांचे आहे त्यांच्या कार्यकर्तुत्वातून अनेकांना दिशा मिळाली आहे अनेकांना जगण्याचा एक वेगळा अर्थ सापडला आहे जनसामान्य माणसात आदराचे स्थान मिळवून चरित्रवान नेतृत्व म्हणून ते उदयास येत आहेत
अशा या सर्वगुण संपन्न युवा नेतृत्वास पत्रकार चांदसाहेब शेख व संपुर्ण शेख परिवाराच्या वतीने उदंड आयुष्यासाठी उज्वल भवितव्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, उत्तरोत्तर कार्यासाठी, उज्वल यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
आपले कार्य कर्तृत्व समाजासाठी दीपस्तंभ ठरत राहो व तुमच्या हातून लोकहित घडत रहावे यासाठी अल्लाह व ईश्वर चरणी प्रार्थना
*पत्रकार चांदसाहेब शेख मंगरुळ ता. तुळजापुर*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा