संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
शालेय जीवनातील आणि लहानपणाची आठवण म्हणून माजी विद्यार्थी आपल्या शालेय जीवनाला उजाळा देण्यासाठी गेट-टुगेदर कार्यक्रम आयोजित करत असतात आणि हा गेट-टुगेदर चा कार्यक्रम म्हणजे एक जीवनातील आनंदाचा क्षण असतो त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशाला मंगरूळ ता. तुळजापूर. येथील सन 2004 च्या दहावीच्या बॅच च्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर (स्नेहसंमेलन )कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्याध्यापक गायकवाड सर,तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदे सर, उकरंडे सर खाडे मॅडम, ढोकळे सर, उपाशे सर, हे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते
. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत डोंगरे यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल सर्व सहकार्यानी त्यांच्याबाबत आभार व्यक्त करतो
या कार्यक्रमासाठी तब्बल 43 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते...
कार्यक्रमानिमित्त अमर लक्ष्मण लबडे या विद्यार्थ्यांनी हागलुर येथील अनाथ आश्रमशाळेस 5000/-- रुपये देणगी दिली.
याप्रसंगी 21 वर्षानंतर भेटलेले मित्र एकमेकांना भेटून इतके आनंदित झाले होते की एकमेकांना ते मिठी मारून तू कसा आहेस तुझे कसे चालले आहे असे विविध प्रकारे हालचाल खुशाली विचारत होते
या कार्यक्रमास सन 2004 च्या बॅचचे विद्यार्थीनीं स्वाती खोपडे, सोनल पवार, सारिका कोरेकर ,अंजली ढोबळे ,तर विद्यार्थी अभिजीत डोंगरे ,परमेश्वर काळे, अमोल मोरे, रजनीकांत तांबे ,अझहर शेख ,संताजी पाटील, लक्ष्मण माळी, अजिंक्य सरडे ,अमर लबडे ,गोविंद डोंगरे ,संभाजी सरडे ,वासुदेव सरडे, भागवत सरडे, रसूल शेख, सत्यवान लबडे ,रामचंद्र उर्फ बंट्या खोपडे, सागर खोपडे , आनंदा कोरेकर , सोमनाथ रोकडे ,विशाल गायकवाड, अमर जाधव ,सोमनाथ रोकडे ,बबलू जगदाळे ,अमोल जाधव, शशिकांत सुरवसे ,श्रीकांत वडणे, राजू शेख, दिलदार शेख, युनूस शेख ,अमोल बोराडे ,ईश्वर भुवाळ, ज्ञानेश्वर कदम, इत्यादी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते
शेवटी कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या निरोप घेऊन आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले..






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा