संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
काटगाव जिल्हा परिषद (गट)सदस्य निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तामलवाडी येथील सतीश मच्छिंद्र माळी हे इच्छुक असून त्याने रीतसर पक्षाच्या तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्याकडे महाविकास आघाडी मधून निवडणूक लढविणार असल्याची मागणी केली आहे अशी आमच्या सूत्रांकडून माहिती मिळाली असून , सतीश माळी हे सध्या तामलवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा एका नामांकित सहकारी कामगार सोसायटीचे सचिव असून काटगाव जिल्हा परिषद मतदार संघात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्यामुळे कार्यकर्त्याकडून सतीश माळी यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे माळी हे पक्षाच्या पडझडीच्या काळातही पक्षाशी एकनिष्ठ ठामपणे उभे होते, त्यांची ओळख कामगार चळवळीतील नेतृत्व म्हणून आहे, त्यांना वीस वर्षाचा राजकारणाचा दांडगा अनुभव आहे व मागील लोकसभा व विधानसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी त्यांनी पायाला भिंगरी बांधून खूप कष्ट घेतलेले असल्यामुळे त्यांची काटगाव मतदार संघात खूप मोठी चर्चा चालू असुन पक्षश्रेष्ठी यांना उमेदवारी देणारच असे कार्यकर्त्यातून बोलले जात आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा