निमगाव (म)-- प्रतिनिधी
रामचंद्र मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी.
ओंकार साखर कारखाना चांदापुरी च्या ६व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रायगड जिल्हा बॅंकेचे चेअरमन जयंत पाटील ,ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोठी टाकुन गुळाचा शुभारंभ करण्यात आला या वेळी बोलताना बोञे पाटील म्हणाले की मी शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या काय अङचणी आहेत याची जाणीव मला आहे त्यामुळेच ओंकार साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे हित ङोळ्यासमोर ठेवुन ऊसाला गेल्या पाच वर्षीपासुन सर्वात उच्चाकी जास्त दर दिला २०२५ व २०२६ या गणित हंगामाचा दर सर्वोत्तम राहिल अशी ग्वाही दिली याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करू नये तसेच अधिकाधिक ऊस ओंकार कारखान्याला द्यावा अशी आवाहन बोञे पाटील यांनी यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले तसेच या परिसरातील आणखी एक कारखाना आपण चालू करणार असल्याचे त्यांनी सांगितले
याप्रसंगी बोलताना
जयंत पाटील म्हणाले की ओंकार साखर कारखाना परिवाराने बंद अवस्थेत असणारे साखर कारखाने चालु करून शेतकऱ्यांना सर्वात जास्त बाजार भाव देऊन वेळेत ऊस बीले दिली लाखो हातांना काम दिले व भागाचा कायापालट केला शिवाय ओंकार साखर परिवाराने कारखान्याच्या संदर्भातील ऊस उत्पादक शेतकरी असो, सभासद असो ,वाहतूक करणारी वाहने असो, अथवा ऊस तोडणी कामगार असो किंवा कारखान्यात काम करणारे अधिकारी व कर्मचारी असो यांचा एकही रुपया त्यांनी थकित न ठेवता सर्वांना वेळेवर बीले दिले त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशातील हा एकमेव कारखाना असल्याने बोञे पाटील यांचे कौतुकास्पद कामगिरी आहे गत वर्षी च्या ऊसास ३००५ दर दिल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बोञे पाटील यांचा सन्मान करण्यात आला
या प्रसंगी अर्बन बॅकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील ओंकार च्या संचालिका रेखाताई बोञे पाटील चांदापुरी सरपंच जयवंत सुळ जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे केन मॅनेजर शरद देवकर तरंगफळचे सरपंच नारायण तरंगे निमगाव चे माजी सरपंच हनुमंत पवार जवाहर शिक्षण प्रसारक मंङाळाचे उपाध्यक्ष महादेव मगर सर्जेराव पवार प्रकाश पवार रावसाहेब तरंगे दत्ता मगर प्रकाश मगर नितीन जाधव सर्जेराव पिंगळे यासह बहुसंख्य शेतकरी वाहन धारक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावता शिंदे, निलेश गुरव, सर्जेराव कचरे , इत्यादी ऊस उत्पादक शेतकरी सभासद कर्मचारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रास्ताविक कारखान्याचे ओ एस रमेश अवताडे यांनी केले सूत्रसंचालन साठे सर यांनी केले तर शेवटी रामचंद्र सर्जेराव मगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा