Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

वारकरी साहित्य परिषदेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी सचिन महाराज मोहिते, तर उपाध्यक्षपदी महेश सूतार, जिल्हा उपाध्यक्ष सुग्रीव मिटयां

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*


 






-----वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्याच्या इंदापूर तालूका अध्यक्षपदी ह.भ.प. सचिन संभाजी मोहिते महाराज यांना पुणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब महाराज हांडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
     टणू (ता.इंदापूर) येथील ग्रामदैवत भर्तरीनाथ मंदिरात वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांची सर्वसाधारण सभेचे आयोजण करण्यात आले होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष माऊली महाराज कुंजीर, तानाजी महाराज खराडे, सविता गवते, सुमन वाईकर, बाळासाहेब महाराज आटोळे, सुग्रीव महाराज मिटकल आदी पदाधिकारी व टणू पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








     सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ह.भ.प. सचिन संभाजी मोहिते महाराज यांची इंदापूर तालुकाध्यक्षपदी, ह.भ.प. महेश महाराज सुतार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी सुग्रीव महाराज मिटकल यांना निवडीचे पत्र पुणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब महाराज हांडे यांच्या हस्ते देण्यात आले.
    इंदापूर तालुक्यातील तरुण व ज्येष्ठांपर्यंत वारकरी साप्रदायाचे विचार पोहोचवण्याचे तसेच वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत साप्रदायाचे काम मजबूत करणार असून, व्यसनमुक्तीसाठी युवकांना नवी दिशा देण्याचे व सर्वसमावेशक मार्गदर्शन करण्याचे काम यापुर्वी केले आहे व पुढेही करण्याचा मानस निवडी प्रसंगी ह.भ.प. सचिन महाराज मोहिते यांनी बोलताना व्यक्त केला. 
फोटो - ह.भ.प. सचिन संभाजी मोहिते.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा