Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचा उपक्रम यशस्वी


 

उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या स्मृतिदिन आयोजित काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर – 


ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेचे परीक्षण साहित्य क्षेत्रातील मान्यवर जेष्ठ लेखक दिनकर काकडे यांनी केले. त्यांनी कवितेच्या आशय, भाषिक सौंदर्य, सादरीकरण आणि भावनिक अभिव्यक्ती यावर आधारित मूल्यांकन करून विजेत्यांची निवड केली.

 विजेते कवी

सर्वोत्कृष्ट 

यशवंतराव हिराबाई पगारे, बदलापूर ठाणे

उत्कृष्ट

१. अनुज अविनाश केसरकर मुंबई

२. दादासाहेब शेख रत्नागिरी

प्रथम

१. डॉ. सुहास कुमार बोबडे कराड

२. आलिया गोहर ,धुळे

३. प्रज्ञा घोडके, पुणे

द्वितीय

१.आलिया रफीक शेख ,सातारा

२.क्षीरसागर कृष्णा अविनाश, अहिल्यानगर

३.भारती सावंत

तृतीय

१.बबनराव मोरे हिंगोली

२.कार्तिका नितीन पाटील ,पालघर

३.अमीर पटेल

उत्तेजनार्थ

१. सौ ज्योत्स्ना सुहास डासाळकर, कोल्हापूर

२.रजिया जमादार सोलापूर ३. लोपामुद्रा शहारे, नागपूर

४. चंद्रभारती भारती, छ.संभाजीनगर

५)विकास गोपाळ खराते औसा लातूर

या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे उपाध्यक्ष खाजाभाई बागवान, सहसाचिवा व जेष्ठ साहित्यिक अनिससिकंदर व संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संस्थेच्या कार्यकारिणीने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.विजेत्यांना वतीने ई प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे युगस्त्री फातिमामाईच्या कार्याला उजाळा मिळाला.भविष्यात युगस्त्री फातिमाबी यांचे कार्य समजून घेण्यास मदत होईल यासाठी सर्व कवितांचा प्रातिनिधीक संग्रह संपादित करण्याचा असे आयोजिका कवयित्री अनिससिकंदर शेख यांनी आपले मत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा