उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
सोलापूर, दि. १३-मुळेगाव जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका कवयित्री हाफिजाबी बागवान लिखित सोनचाफा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.हा कार्यक्रम डॉ. शिफा यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. समीर बागबान, साहिल बागवान, तहसीन बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्वागत कवी खाजाभाई बागवान यांनी केले. सूत्रसंचालन सैफन बागवान यांनी केले तर आभार कवयित्री बागवान यांनी मानले. काव्यसंग्रहास प्रख्यात कवयित्री डॉ. माधुरी चौधरी यांची प्रस्तावना लाभली आहे तर पाठराखण ज्येष्ठ कवयित्री अनिसा सिकंदर शेख यांनी केली आहे. दरम्यान, कवयित्री हाफिजा यांना भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. ई. जा. तांबोळी, सचिव अय्युब नल्लामंदू, प्राचार्य शकील शेख, ज्येष्ठ कवी मुबारक शेख, शफी बोल्डेकर आदींनी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा