अकलूज ---प्रतिनिधी केदार लोहोकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
गिरझणी येथील धनशैल्य विद्यालय व किडझी अकलूज येथे दिवाळीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध पारंपारिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.दिवाळीच्या सुट्टीपूर्वीच्या शेवटच्या दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत दिला व आकाशकंदील रंगभरण,आकाशकंदील तयार करणे,दिवा सजावट तसेच विविध किल्ला निर्मिती अशा स्पर्धांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. पारंपारिक मूल्यांचा सन्मान राखत विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना सादर केला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोडधोड वाटप करून दिवसाची सांगता आनंदी वातावरणात करण्यात आली.येणारी दिवाळी आनंदात जावो आणि सुट्टीनंतर नव्या उमेदीने शाळेत परतू, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपला आनंद व्यक्त केला.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजनबद्ध तयारी केली. पारंपारिक स्पर्धांमुळे पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. एकत्रितपणे काम करत विद्यार्थ्यांनी स्पर्धेचा तसेच दिवाळी साजरी करण्याचा उत्साह दुणावला.
धनशैल्य विद्यालय व किडझी अकलूज यांच्या माध्यमातून पारंपारिक संस्कृती,सर्जनशीलता आणि आनंद यांचा संगम अनुभवास आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा