Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

इंदापूर मध्ये मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारणीसाठी प्रयत्न करणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन तर इंदापूर तालुका अधिकाऱ्यांचा तालुका अशी ओळख होण्यासाठी सुसज्ज वाचनालय व अभ्यासिका हवी अशी कृषी पदवीधर संघटनेची आग्रही मागणी

सहसंपादक --डॉ.संदेश शहा

 टाइम्स 45 न्यूज मराठी

  मो:-9922419159

आपला भारत देश कृषी प्रधान देश असून कृषी पदवीधर संघाने केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. मेळाव्यातून आधुनिक कृषी क्षेत्रातील माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संघाचा उपक्रम स्तुत्य आहे. संघाच्या मागणीनुसार कृषी महाविद्यालय तसेच मत्स्य महाविद्यालय इंदापूर येथे उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

इंदापूर शहरातील

सुसज्ज वाघ पॅलेस येथे इंदापूर तालुका कृषी पदवीधर संघाने आयोजित केलेल्या पदवीधारकांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना मंत्री भरणे बोलत होते. यावेळी यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, औरंगाबाद विभागाचे मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे आदी मान्यवरांसह तालुक्यातील कृषी पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, इंदापूर तालुका हा भीमा नीरा नद्यांच्या खोऱ्यात वसला असून तालुक्यास उजनी धरणाचे विस्तीर्ण पाणलोट क्षेत्र लाभले आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गोड्या पाण्यातील मासळीने देशात सर्वत्र आपली हक्काची बाजारपेठ मिळवली आहे तर तालुका हा ८१ टक्के बागायती झाला असून शेतकरी निर्यातक्षम शेतीमालाचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आगामी काळात कृषी महाविद्यालय, मत्स्य महाविद्यालय, शेतीमाल पुरक प्रकिया उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

मंत्री भरणे पुढे म्हणाले, कृषी क्षेत्रात पारंपरिक शेती ऐवजी बाजारपेठेत जे विकते त्यांचे निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण कल्पना आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. या क्षेत्रातील पदवीधरांनी ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

सरकारच्या वतीने कृषी यांत्रिकीकरणाला सध्या प्राधान्य देण्यात येत असून या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अनुदानात ट्रॅक्टर, शेती अवजारे मिळाली आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत सक्षमतेने पोहोचवणे गरज आहे. संघाने योग्य बियाणे, खते, ठिबक सिंचनासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. क्रीडामंत्री पदाचा पदभार सोडताना शेवटच्या दिवशी एक शासन निर्णय काढून इंदापूर मधील क्रीडा संकुलासाठी ५६ कोटी रुपये मंजूर झाले.आता कृषिमंत्री म्हणून राज्याला फायदा होणारच आहे. पण वाढपी घरचा असल्याने संघाने ज्या मागण्या केल्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी दयानंद व्यवहारे यांनी संघटनेच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण इयत्ता पाचवी ते दहावी साठी शासनाने कृषि हा विषय नव्याने अंतर्भूत केला असून हा विषय शिकविण्यासाठी बीएससी ऍग्री पदवीधरांचीच नियुक्ती करण्यात यावी,

महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांमध्ये ज्या ठिकाणी बीएससी ऍग्री च्या जागा आहेत, त्या जागांवर कृषी पदवीधारकच भरला जावा, कृषि विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे तातडीने भरल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊन शेतीविषयक प्रश्नही मार्गी लागतील,

बीएससी ऍग्री या पदवीस महाराष्ट्र शासनाकडून तांत्रिक दर्जा प्राप्त व्हावा, पुणे सोलापूर हायवेलगत महाराष्ट्र शासनाचे ६५ एकर तालुका बीजगुणन केंद्रात शासकीय कृषी महाविदयालय, मत्स्य व्यवसाय महाविद्यालय, केळी अथवा पेरु संशोधन केंद्र उभा करावे, इंदापूर तालुक्यामध्ये वैरण विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पुर्वीच सादर करण्यात आला आहे, त्यास तातडीने मंजूरी मिळावी तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंदापूर शहरात विविध स्पर्धा परिक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे, या विद्यार्थ्यांसाठी भव्य वाचनालय व सुसज्ज अभ्यासिका उभी राहिल्यास इंदापूर तालुक्याची ओळख ही "अधिका-यांचा तालुका "अशी होण्यास मदत होईल आदी प्रमुख आग्रही मागण्या राज्याचे कृषी मंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कडे करण्यात आल्या.

यावेळी प्रास्ताविक अमोल भिसे यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले. निवेदन वाचन दयानंद व्यवहारे यांनी तर आभार गणेश सूर्यवंशी यांनी मानले. मेळावा यशस्वीतेसाठी हनुमंत बोराटे, मंगेश लोणकर, भरत हरणावळ,मोरेश्वर कोकरे,अजहर सय्यद यांच्यासह अन्य सहकारी यांनी प्रयत्न केले.

दरम्यान पूर्व नियोजित मिटिंग असल्याने मुंबईस गेलेल्या राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मेळाव्यास फोन व्दारे शुभेच्छा देऊन संघाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिल्याची माहिती दयानंद व्यवहारे यांनी संघाच्या वतीने दिली.

   इंदापूर तालुक्याला उजनी जलाशयाचा भागात मोठा नैसर्गिक साठा आहे. या माध्यमातून मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जाते. तालुक्याच्या दोन्ही बाजूला भीमा आणि निरा नद्या आहेत. त्यामुळे इंदापूरमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल,अशी माहिती कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी दिली.

यावेळी संघाच्या वतीने श्यामल भगत मॅडम (

केंद्रीय लोकसेवा आयोग २०२४ मधून आयएएस पदी निवड )

 नितीन काळे साहेब (

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजापत्रित अधिकारी महासंघ ), डॉ. बाळासाहेब चव्हाण सर ( संचालक, आय सी ए आर, न्यू दिल्ली ), कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर), वाघ पॅलेस चे मालक व माजी उपनगराध्यक्ष, इंदापूर नगरपालिका

अरविंद तात्या वाघ यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी दयानंद व्यवहारे यांनी संघटनेच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण इयत्ता पाचवी ते दहावी साठी शासनाने कृषि हा विषय नव्याने अंतर्भूत केला असून हा विषय शिकविण्यासाठी बीएससी ऍग्री पदवीधरांचीच नियुक्ती करण्यात यावी,

महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांमध्ये ज्या ठिकाणी बीएससी ऍग्री च्या जागा आहेत, त्या जागांवर कृषी पदवीधारकच भरला जावा, कृषि विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे तातडीने भरल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊन शेतीविषयक प्रश्नही मार्गी लागतील,

बीएससी ऍग्री या पदवीस महाराष्ट्र शासनाकडून तांत्रिक दर्जा प्राप्त व्हावा, पुणे सोलापूर हायवेलगत महाराष्ट्र शासनाचे ६५ एकर तालुका बीजगुणन केंद्रात शासकीय कृषी महाविदयालय, मत्स्य व्यवसाय महाविद्यालय, केळी अथवा पेरु संशोधन केंद्र उभा करावे, इंदापूर तालुक्यामध्ये वैरण विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पुर्वीच सादर करण्यात आला आहे, त्यास तातडीने मंजूरी मिळावी तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंदापूर शहरात विविध स्पर्धा परिक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे, या विद्यार्थ्यांसाठी भव्य वाचनालय व सुसज्ज अभ्यासिका उभी राहिल्यास इंदापूर तालुक्याची ओळख ही "अधिका-यांचा तालुका "अशी होण्यास मदत होईल आदी प्रमुख आग्रही मागण्या राज्याचे कृषी मंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कडे करण्यात आल्या.

यावेळी प्रास्ताविक अमोल भिसे यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले. निवेदन वाचन दयानंद व्यवहारे यांनी तर आभार गणेश सूर्यवंशी यांनी मानले. मेळावा यशस्वीतेसाठी हनुमंत बोराटे, मंगेश लोणकर, भरत हरणावळ,मोरेश्वर कोकरे,अजहर सय्यद यांच्यासह अन्य सहकारी यांनी प्रयत्न केले.

दरम्यान पूर्व नियोजित मिटिंग असल्याने मुंबईस गेलेल्या राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मेळाव्यास फोन व्दारे शुभेच्छा देऊन संघाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिल्याची माहिती दयानंद व्यवहारे यांनी संघाच्या वतीने दिली.

मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचा धडाका:

इंदापूर मध्ये आदल्या दिवशी कृषी पदवीधर संघाच्या मेळाव्यात इंदापूर येथे मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिले होते. या विषयावर त्यांनी मुंबई मंत्रालयात दुसऱ्या दिवशीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या समवेत विशेष बैठक घेतली. या बैठकीत इंदापूर येथे राज्यातील पहिलेच तंत्रज्ञानावर आधारित मत्स्य प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र उभारणीवर सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे प्रगत मत्स्य महाविद्यालय होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या झटपट पाठपुराव्याचे कौतुक व स्वागत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा