*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448.
वेळापूर येथील इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या गटात राज्य खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली असून
पिंपरी चिंचवड (पुणे) येथे झालेल्या पुणे विभागीय स्पर्धेत इंग्लिश स्कूलने अंतीम सामन्यात त्यांनी पुणे ग्रामीण संघाचा ७ गुणांनी विजय मिळविला.
या कामगिरीवर हा संघ अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला आहे. संघास क्रीडाशिक्षक सतीश कदम, शिवाजी जाधव, सोमनाथ बनसोडे, श्रीनाथ खटके, रामजी कश्यप यांचे मार्गदर्शन लाभले.
या संघाचे अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरी स्पर्धेसाठी आमदार उत्तमराव जानकर, वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगूसकर, अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष जावेद मुलाणी, संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष सुभाष कदम संस्थेच्या संचालिका डॉ. सौ मीनाक्षी कदम, सचिवा डॉ. प्रियदर्शनी महाडिक, संचालिका तेजस्विनी कदम, शाळा समिती चेअरमन प्रतापराव पाटील, प्राचार्य आर. बी. पवार, उपमुख्याध्यापक पठान शिवशरण, पर्यवेक्षक सावळे बी एस, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अमोल मंडलिक, व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप जगदाळे, उपाध्यक्ष प्रियंका पोरे यांनी अभिनंदन केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा