Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

या देशात वाईट व्हायचं आणखी काय राहिलंय सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या अंगावर भर कोर्टात फेकले चप्पल... राजेंद्र शेलार आता देश संविधानानुसार चालणार नाही तर मनुस्मृतीतल्या सनातन नियमाने चालवला जाणार?


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

भारताच्या इतिहासातील अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आज घडली. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश श्री. गवईंना चप्पल फेकून मारण्याचा प्रकार घडला. स्वतःला सनातन धर्माचे ठेकेदार समजणारे अजूनपर्यंत रस्त्यावर मारझोड करत होते. आज देशाची सर्वोच्च संविधानिक संस्था असलेल्या सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायाधीशांवर हल्ला करण्याची त्यांची मजल गेली. चार दिवसांपूर्वी दिलेला सरन्यायाधीश गवईंचा निकाल त्या कर्मठाला आवडला नाही. खंडित झालेली मूर्ती नवी बनवून तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने द्यावेत असे त्यांचे म्हणणे होते. सुप्रीम कोर्टाने ही धार्मिक बाब असल्यामुळे संविधानानुसार त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्याचा राग मनात धरून भर कोर्टात सरन्यायाधीशांना चप्पल फेकून मारली. *जर या देशाचे सुप्रीम कोर्टच सुरक्षित नसेल, तर रस्त्यावर फिरणारी माणसं कशी सुरक्षित राहतील?*


या देशातल्या मूठभर लोकांनी मनुस्मृतीच्या आधारे सर्वांवर सांस्कृतिक, सामाजिक, भावनिक राज्य केले. त्या राज्यात जनतेला गुलामासारखे वागवले जात होते. शिकण्याचा व नोकरीचा अधिकार नव्हता. मनाप्रमाणे वागता येत नव्हते. तसे वागले तर धर्म बुडतो म्हणून सांगितले जात होते. त्यांनीच ज्ञानदेवाला वाळीत टाकले, अधिकार नसताना उपदेश केला म्हणून तुकारामांची गाथा बुडवली. तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला छत्रपती होण्याचा अधिकार नाही असे सांगून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला... मनुस्मृतीतला सनातन धर्म माणसांना माणूस मानायला तयार नव्हता, शुद्रांच्या पराक्रमाला मनुस्मृतीत स्थान नव्हते. *हे सगळं मोडून काढलं भारतीय संविधानाने!*


संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले. धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन संविधान मानवतेचा पुकार करते. ज्याची सावलीही मनुवाद्यांना भ्रष्ट वाटत होती असे लोक राज्यकर्ते झाले, अधिकारी झाले, कलेक्टर झाले, सचिव झाले, न्यायाधीश झाले. इतकेच नाही तर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि देशाचे राष्ट्रपती झाले. मनुवाद्यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यांनी शिवाजी महाराज आणि संतांचा भगवा पळवला आणि धर्म संकटात असल्याची आरोळी ठोकली. मात्र सत्ता आली आणि हे मनुवादी शिवाजी महाराजांना विसरले. राज्यपाल आणि मंत्रिपदावर बसलेली लबाड माणसं शिवाजींचा अपमान करू लागली. एका बाजूला बहुजनांच्या दैवतांचा जयजयकार करायचा आणि त्याचवेळी त्यांना कमी लेखायचे, शिवाजी महाराज छत्रपती होण्याच्या योग्यतेचे नव्हते असे सांगायचे. इतकी दुटप्पी वागणूक जगाच्या इतिहासात इतरत्र कोठेच पहायला मिळणार नाही. विरोधात असला तर विरोधीच वागू , बोलू असा जगाचा इतिहास आहे. पण इथले मनुवादी ज्यांच्याशी द्वेषाने, तिरस्काराने वागले, ज्यांना विरोधी केला, त्यांचेच खोटे गुणगान गाऊन जनतेला भ्रमिष्ट करत राहीले. यालाच म्हणतात मनुवाद्यांची 'गोबेल्स' चाणक्यनीती.. या मूठभरांना संविधान अडचणीचे झाले आहे. त्यांना मनुस्मृती हवी आहे. म्हणूनच आज सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायाधीशांवर चप्पल फेकली. उद्या मारायला कमी करणार नाहीत.. संविधानाला साक्ष ठेऊन या हलकट, नाठाळ, मस्तवाल झालेल्या मनुवाद्यांचा तीव्र निषेध करतो. बहुजनांना सावध होण्याचे आवाहन करतो



*- राजेंद्र शेलार*

सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा