Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

पटेल...होय, निश्चितच पटेल...! सासु--नणंदच्या कटकारस्थाना मुळे सुनेचे आयुष्य उद्ध्वस्त...!!


 

इक्बाल बाबासाहेब मुल्ला पत्रकार    सांगली

मो;--8983587160

सासू नणंद च्या *त्रासामुळे* त्यांच्या *कटकारस्थानामुळे* "निरागस" सुनेचे बळी जातं असून *परक्या* घरातून आणलेल्या मुलीचे जीवन *उध्वस्त* करणाऱ्या अशा सासू - नंणद वर धाडसाने *पोलीस ठाण्यात* गुन्हा नोंद करणे काळाची गरज बनली आहे. गैरसमजातून, सासरच्या "जाचामुळे" अनेक मुली या *तलाकच्या* बळी पडत असून, 2-4 महिन्यात *तलाक* होणाऱ्या प्रकरणांची यादी झपाट्याने वाढत आहे आणि हिच समाजासाठी *चिंताजनक* बाब बनली आहे.

 *सुनेचा दुर्दैवी छळ!* रात्री *बेडरूम* मध्ये सासू - नणंद ची परवानगी घेऊन प्रवेश करणे, *आई - वडिलांशी* फोनवर बोलू न देणे, दुपारी *झोपू* न देणे,दररोज *टॉयलेट* "साफ" करून घेणे, मुलाला त्याच्या पत्नीबद्दल वाईट सांगणे, पतीच्या *नातेवाईकांबरोबर* 

बोलू न देणे, घरात "परगावाहून" आलेल्या नातेवाईकांना *चहासाठी* देखील न विचारणे,मग्रुरी दाखवत नवऱ्याने *मारहाण* करणे, गरीब परिस्थिती असताना देखील *माहेरहून* पैशाची मागणी करणे, दिवसभर काम करून *जनावराप्रमाणे* राबवून घेणे ,आदी प्रकारे या सुनेला त्रास देऊन , *माणुसकीशून्य* "जनावराप्रमाणे" वागणूक देऊन तिला तलाक देण्यासाठी *प्रवृत्त* करायचे आणि तलाक झाल्यानंतर दुसरे *सावज* शोधायचे, आणि पुन्हा "दुसरे लग्न" करायचे असे अनेक प्रकार सध्या होताना दिसतं आहेत. अशा "नीच" लोकांची *गाढवावरून धिंड* काढून यांची खरी "लायकी" समाजासमोर दाखवणे गरजेचे बनलेले आहे.

   *नणंद चा हस्तक्षेप आणि भावाचा संसार उध्वस्त !* 

 कोमल *साजूक चेहरा* परंतु *सैतानी वृत्ती* असणाऱ्या *पाताळयंत्री* नणंद सुनेला "हैराण" करताना स्वतःदेखील नवऱ्याशी वागताना आपली *लायकी* दाखवलेल्या असतात.आणि त्यामुळे त्यांचाही *तलाक* झालेला असतो.नवऱ्याने घरातून "हाकललेले" असते . घरात सासू च्या सोबत सुनेला त्रास देताना त्यादेखील *आगीत तेल* ओतून भावाचा सुखी संसार उध्वस्त करण्यास "हातभार" लावत असतात. *भावजय* घरात टिकली तर माझा *खर्च* करायला भाऊ "कचरणार" , शिवाय भावाला *मुले* झाली तर "खर्च" आणखी वाढणार ,मग मलाच घरातून *बाहेर* जावे लागेल म्हणून नणंद भावजय ला *त्रास* देत नसावी ना ?? शिवाय घरात सून नसेल तर आई -वडिलांच्या इस्टेट - *संपत्तीमध्ये* देखील जास्त *वाटणी* मिळू शकते असाही "धूर्त डाव" या "चाणाक्ष" नणंद चा असू शकतो.

सासू - नणंद आणि नवऱ्याच्या *अमानुष* छळा ला पोलीस ठाण्यात "दाद" मांडता येऊ शकते. तलाक चा *शिक्का* विनाकारण "कपाळावर" बसलेल्या या मुलींचा दोष काय ?? तलाक झाल्यास *दुसरा विवाह* होण्यास प्रचंड "अडचण' येते, या त्रासाला कारणीभूत कोण ?? पुन्हा एकदा *कोवळ्या कळ्या* खुरटण्याआधी या "हरामी" प्रवृत्तीच्या" बेफाम झालेल्या आणि निरागस मुलींना *वेठीस* धरणाऱ्या उद्दाम सासू - नणंद आणि नवऱ्याला *धडा* शिकवणे ही आज काळाची गरज बनली आहे हें मात्र निश्चित ! 


 *इकबाल बाबासाहेब मुल्ला* *पत्रकार--सागली*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा