Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

व्यक्तीमत्व हीच खरी ओळख आणि आत्मविश्वास हीच खरी ताकद--विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये पोलिस निरीक्षक --'सूर्यकांत कोकणे' यांचे प्रतिपादन


 

सहसंपादक- डॉ-संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9922419159

युवापिढी ही राष्ट्रीय संपत्ती असून ही पिढी देशाचे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यामुळे युवापिढीचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व हीच खरी ओळख असून त्यांची आत्मविश्वास हीच खरी ताकद आहे असा प्रेरणादायी संदेश इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिला.

विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास संदर्भात मार्गदर्शन करताना श्री. कोकणे बोलत होते. हा अनोखा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

यावेळी शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण या व्यक्तिमत्त्वाच्या स्तंभांवर श्री. कोकणे यांनी विशेष भर दिला. पोलीस सेवेतून मिळालेल्या वास्तव अनुभवांच्या जोरावर त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ दिले. व्यक्तिमत्त्व विकासाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना श्री. कोकणे यांनी “सुंदर व्यक्तिमत्त्व हे जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कसे आवश्यक आहे हे पटवून दिले. कायद्याच्या अंमलबजावणीतील अनुभव मांडून त्यांनी नेतृत्वगुण आणि टीमवर्कचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी व्याख्याना दरम्यान वास्तवातील उदाहरणांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रत्यक्ष परिणाम दाखवून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी करिअर व वैयक्तिक आयुष्यातील प्रश्न विचारले असता श्री. कोकणे यांनी सखोल व व्यवहार्य उत्तरे देत त्यांनी आत्मविश्वास वाढविण्याचे मार्ग सांगितले. करिअर घडविताना केवळ अभ्यास नव्हे तर उत्तम व्यक्तिमत्त्व सुद्धा यशाची गुरुकिल्ली ठरते, हे त्यांनी पटवून दिले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. संतोष देवकाते यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा