Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

सोलापूर हैदराबाद रोडवर चंदन काटा येथे एसटी व दुचाकीचा अपघात --पत्नी ठार तर पती गंभीर जखमी


 

सोलापूर --प्रतिनिधी आबिद बागवान

टाइम्स 45 न्यूज मराठी

सोलापूर हैदराबाद रोडवर एसटी – दुचाकीचा अपघात ; पत्नी ठार तर पती गंभीर


सोलापूर शहराजवळील हैदराबाद रोड, चंदन काटा येथे रविवारी झालेल्या एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. एसटी बस क्रमांक MH 40 CM 6078 आणि दुचाकीची धडक होऊन हा अपघात झाला.


मृत महिलेचे नाव शाहेनाज महेबुब शेख (वय 34, रा. कुंभारी, दक्षिण सोलापूर) असे आहे, तर तिचा पती महेबुब नबिलाल शेख (वय 38,) हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दांपत्य तांदुळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नानंतर दुचाकी क्रमांक MH 13 EM 3131 वरून परतत असताना हैदराबाद रोड, चंदन काटा येथे हा अपघात घडला.



मयत शाहेनाज यांच्या पश्चात पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. जखमी महेबुब यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोलापूरचे शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा