कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
“ *प्रत्येक घरात हसू फुलावे, प्रत्येक मनात आनंद उभा राहावा,” अशा भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर शहर युवक कार्याध्यक्ष वसीम बागवान यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील प्रभाग क्र. ७ आणि इतर भागातील नागरिकांना दीपावली फराळाचे वाटप केले. विशेष म्हणजे प्रभाग क्र. ७ मध्ये त्यांनी घरोघरी जाऊन वयोवृद्धांचे आशीर्वाद घेतले आणि प्रेमळ, निस्वार्थी भावनेतून हा उपक्रम राबविला.*
*या कार्यात रोहन सूर्यवंशी, सद्दाम भाई बागवान, समीर बागवान, सलीम बागवान, विराज लोणकर, राहुल बोरीकर यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. व्यंकटेश नगर, कांबळे गल्ली, शिवाजी चौक, ठाकर गल्ली, मेन पेठ, नेहरू चौक आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरात हा फराळ वाटप कार्यक्रम पार पडला.*
*वसीम बागवान हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून, आरोग्य शिबिरे, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि शासकीय योजनांचे जनजागरण अशा विविध उपक्रमांत सहभागी राहतात. तळागाळातील युवकांचा चेहरा आणि भावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.या उपक्रमाद्वारे त्यांनी सुमारे १ हजार किटचे वाटप करून समाजात आपुलकी आणि सलोखा यांचा दीप उजळविला.*




 
 

 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा