कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- येथील पुरातन नृसिंह मंदिरात सरदार विंचूरकर यांनी दीपावली उत्सवात नरक चर्तुदशी व दिवाळी पाडवा बलीप्रतीपदा या दोन दिवशी पुरणाचे दिवे(दीप) ओवाळणे म्हणजे तांब्या उपडा करून त्यावर पुरणचा लेप देऊन पुरणाच्या तांब्यावर चार पुरणाचे दीप व खाली चार दीप लावतात तसेच सहस्र दीपांनी नृसिंहा देवतेला आरती करताना दीप ओवाळतात यास कुरवंडी ओवाळने म्हणतात..तसेच साखर भाताची ही मानाची कुरवंडी असते...नरक चर्तुदशीला दंडवते पुजारी परिवार व नृसिंह भक्त यांच्या कुरवंडी असतात व बलीप्रतीपदा (दिवाळी पाडवा) या दिवशी डिंगरे पुजारी परिवार व पंचक्रोशीतील सर्व नृसिंह भक्त कुरवंडी सोहळ्यात सहभागी होतात..लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट तर्फे नृसिंह पादुकांचे पुजन,..पंचामृत अभिषेक,..पालखी सोहळा आयोजीत केला जात असतो...या वर्षी नरक चर्तुदशी पादुकांचे पुजन पालखी पुजन विश्वस्त डाॅ.प्रशांत(अभय) सुरू व बलीप्रतीपदा (दिवाळी पाडवा) दिवशी कुरवंड्याचे पुजन,..पादुकांचे पुजन,..व..पालखी पुजन विश्वस्त अभयकुमार वांकर पाटील यांचे हस्ते करण्यात आले.!..या दिपावली कुरवंडी सोहळ्यासाठी सर्व पुजारी मंडळी ,..ग्रामजोशी,..धर्माधिकारी,.ट्रस्टी..त्यांचे सर्व नातेवाईक,..आप्तेष्ठ,..ग्रामस्थ,..पंचक्रोशीतील भावीक नृसिंह भक्त..कुरवंडी दीप ओवाळणे म्हणजे दुर्जनाचा नाश, संज्जनांचे रक्षण,..अंधाराकडून प्रकाशाकडे,..असत्याकडून सत्याकडे..सकारात्मक उर्जा निर्माण करणे भगवान नृसिंहाची आराधनाकरून -अर्चना करून आशीर्वाद घेणे...धार्मीक सण व दीपावली सण आनंदात साजरा करणे आहे..पुजारी वर्गांच्या घरा-घरातून वाजत गाजत ..सुंदर रांगोळीची सजावट,.. फटाक्यांची आतषबाजी करत ब्रम्हवृंद कुरवंडी दीप घेऊन बरोबर नृसिंह भक्त व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सर्व जण नृसिंह मंदिरात झांज वाजवत येतात..नृसिंह देवतेला सहस्र दीपांनी ओवाळतात नंतर पालखी मंदिरातून नीरा भीमा संगम घाटावर मानाच्या साखर भाताच्या व पुरणाच्या कुरवंडी घेऊन वाजत गाजत जातात तेथे गणेश तीर्थावर कुरवंडी पुजा व ओवाळणे,..पालखीची पुजा होते (सोळखांबी).. परत पालखी मंदिराकडे येते उत्तर दरवाजा जवळ चौथरा वर कुरवंडी ठेवून सर्व सुवासीनी ..महीला वर्ग कुरवंडी पुजा करतात व पालखीचे दर्शन सर्व नृसिंह भक्त घेतात .नवस बोललेले भक्त पालखीखालून लहान बाळांना घेत असतात..कांही कुरवंड्या नवसाच्या असतात.. नंतर पालखी मंदिरात आणतात "नरहरी शामराज की जय" घोषाने पालखीचे सर्व भावीक दर्शन घेऊन कुरवंडी सोहळ्याची सांगता झाली.!..कुरवंडी सोहळा.!..दैदिप्यमान दीपांचा सोहळा.!..ज्ञान दीप लावू जगी.!..सोहळा संपन्न झाला.!..



 
 

 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा