सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
धर्माच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणारे ९ वे शीख गुरू तेग बहादूरजी यांची शोभायात्रा शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी इंदापूर शहरात दाखल झाली. गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिद दिनानिमित्त ही यात्रा काढण्यात आली असून यात्रेचे इंदापूर मध्ये स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यात्रा प्रमुख प्रमुख चरणसिंग सहानी व त्यांचे सहकारी यांनी प्रदीप गारटकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
भारताच्या गौरवशाली इतिहासात अनेक क्रांतिकारक जन्माला आले, ज्यांनी आपल्या धर्म, संस्कृती, आदर्श आणि मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या महापुरुषांपैकी ९ वे शीख गुरु श्री गुरु तेग बहादुर सिंग यांचे नाव देखील आहे. गुरु तेग बहादुर यांना ‘हिंदची चादर’ असेही म्हणतात. धर्म वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. गुरु तेग बहादुर यांचा जन्म अमृतसर येथे २१ एप्रिल १६२१ रोजी माता नानकी आणि शिखांचे सहावे गुरू हरगोविंद यांच्या पोटी झाला. गुरु तेग बहादूर यांचे बालपणातील नाव त्यागमल होते. गुरु तेग बहादुर हे गुरु हरगोविंद साहिब यांचे धाकटे पुत्र होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या भावांकडून घेतले. गुरू तेग बहादुर यांच्या शौर्याबद्दल असे म्हटले जाते की, एकदा ते कर्तारपूरच्या युद्धा नंतर वडील गुरु हरगोविंद साहिब यांच्यासोबत किरतपूरला जात होते. त्यावेळी ते फक्त १३ वर्षांचे होते. मुघल सैन्याच्या एका गटाने त्यांचा पाठलाग करून फगवाडाजवळील पलाही गावात त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या युद्धात त्यांचे वडील गुरु हरगोविंद साहिब यांच्यासोबत गुरु तेग यांनीही मुघलांशी युद्ध केले. लहान वयातच तेगचे धाडस आणि जिद्द यामुळे ते तेग बहादुर बनले, अशी माहिती चरणसिंग सहानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली
.
शीख समाजाचा इतिहास हा शौर्याचा असून त्यांनी भारतीय संस्कृती मध्ये अनमोल योगदान दिले आहे.
गुरु तेग बहादुरजी शहीद यात्रा इंदापुरात आल्याने त्यांची सेवा करण्याचे पुण्य लाभल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.
यावेळी शहरातील नामदेव मंदिरात शिंपी समाज बांधवांकडून स्वागत झाल्यानंतर वाघ पॅलेस या ठिकाणी अन्नदान करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अशोक गानबोटे, सुहास जौंजाळ, मुकुंद विंचू , अमित जौंजाळ,
धनंजय विंचू, आशुतोष गानबोटे, सागर गानबोटे, अविनाश विंचू, हरिदास हराळे, प्रदीप पवार, वसीम बागवान यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा