उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करीत राज्य विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी ए एस ओ या परीक्षेत एकाच वेळी दोन्ही परीक्षेला गवसणी घातल्याबद्दल जुनेद काझी यांचा येत्या मंगळवारी दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी करमाळा तालुक्यातील कंदर ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान होणार असल्याची माहिती ग्रामस्थ मुदस्सर जहागीरदार यांनी दिली
याबाबत अधिक माहिती देताना जहागीरदार पुढे म्हणाले की जुनेद काजी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून कष्ट व परिश्रम घेऊन एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन एकाच वेळी दोन परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचा येत्या मंगळवारी कंदर येथील ग्रामस्थांच्या वतीने शहानुर शाह नाना दरगाहच्या आवारात सकाळी दहा वाजता सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून सदर कार्यक्रमाला करमाळा तालुक्यातील तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा मॅडम तसेच पोलीस निरीक्षक रणजीत माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती जहागीरदार यांनी बोलताना दिली
सदरच्या कार्यक्रमाला कंदर तसेच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जहागीरदार यांनी केले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा