सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
इंदापूर नगरपरिषद पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली असून राजकीय पडघम वाजला आहे. नगराध्यक्षपदाचे खुले आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. मात्र दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता नगरपरिषद सभागृहात झालेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमात आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले.
नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे तसेच निवडणूक विभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे सोडत काढण्यात आली. कार्यक्रमाला मावळते नगराध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सोडतीच्या निकालानंतर सभागृहात कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले. सोडतीनंतर राजकीय जुळवाजुळव सुरू झाली.
सोडतीचा तपशील पुढीलप्रमाणे :
या निवडणुकीत इंदापूर नगरपरिषदेत एकूण १० प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून २ नगरसेवक निवडले जाणार आहेत. अशा प्रकारे २० नगरसेवक पदांसाठी मतदान होणार आहे. यावेळी महिलांसाठी आणि मागास प्रवर्गांसाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण जाहीर झाले आहे.
प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे आहे :
प्रभाग क्रमांक (अ) (ब)
प्रभाग क्रमांक १
अ) अनुसूचित जाती
ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक २
अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३
अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४
अ) नागरी मागास प्रवर्ग महिला
ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५
अ) नागरी मागास प्रवर्ग महिला
ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६
अ) नागरी मागास प्रवर्ग
ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ७
अ) नागरी मागास प्रवर्ग महिला
ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८
अ) नागरी मागास प्रवर्ग
ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ९
अ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०
अ) अनुसूचित जाती महिला, ब )सर्वसाधारण
या आरक्षण सोडतीतून महिलांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली आहे. एकूण २० जागांपैकी १० पेक्षा अधिक जागा महिलांसाठी राखीव आहेत. यात अनुसूचित जाती महिला, ना.मा.प्र. महिला आणि सर्वसाधारण महिला अशा विविध प्रवर्गांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिला उमेदवारांची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
राजकीय पक्षांमध्ये चढाओढ
सोडतीचा निकाल जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. इंदापूरमधील प्रमुख पक्ष — राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उभय गट) तसेच अपक्ष इच्छुक — यांनी आपल्या उमेदवारांच्या यादीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
विविध प्रभागांतील आरक्षणामुळे अनेक नेत्यांचे राजकीय गणित कोलमडले असून, नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः महिलांसाठी राखीव प्रभागांमुळे अनेक कार्यकर्त्या महिला आता निवडणुकीच्या मैदानात उतरायला सज्ज झाल्या आहेत.
नागरिकांचा उत्साह आणि अपेक्षा
आरक्षण सोडत पारदर्शी पद्धतीने झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा