सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 992241915
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ, बरडवस्ती, राहुलनगर, ( सुलतानपूर ) या गावांना सीना नदीला आलेल्या महापुरामुळे प्रचंड फटका बसल्याने अनेकांचे संसार वाहून गेले. या महापुरामुळे अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्यामुळे या पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी इंदापूर पतंजली योग समिती, राष्ट्र सेवा दल, इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले.
महापुरामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. अशा कठीण प्रसंगात इंदापूर शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत जीवनावश्यक साहित्य गोळा केले. या माध्यमातून २५० किट्सचे वाटप करण्यात आले. यात ब्लँकेट, साड्या, कपडे यांसह विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचाही समावेश होता.
या मदत कार्यात नागरी संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे, बाळासाहेब क्षिरसागर, हमीद आतार; राष्ट्र सेवा दलाचे रमेश शिंदे, संदिपान कडवळे; पतंजली योग समितीचे अध्यक्ष मल्हारी गाडगे, रविंद्र परबत, अशोक अनपट, डॉ. रविंद्र काळे, प्रशांत गिड्डे, गणेश दरंगे, किसन पवार, देवराव मते, चंद्रकांत देवकर, ज्ञानेश्वर घोगरे, सायराभाभी आतार आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून विविध संस्थांनी पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदतीमुळे इंदापूर व माढा तालुक्याचे ऋणानुबंध दृढ झाले. ही मदत दिलासा देणारी ठरली. सामूहिक प्रयत्नांमुळे मानवतेचा संदेश अधोरेखित झाला असून पूरग्रस्तांना मोठा आधार मिळाला आहे. या समयोचीत लोकोपयोगी उपक्रमाचे कौतुक होत आहे.
एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या तत्त्वाने ही मदत करण्यात आल्याची माहिती कृष्णा ताटे यांनी दिली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा