Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

नळदुर्ग ता. तुळजापूर येथील पत्रकार आयुब शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला- आरोपी पोलिसाच्या ताब्यात- न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

नळदुर्ग ता.तुळजापूर येथील पत्रकार आयुब शेख यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अजहऱ मैनुद्दीन शेख (वय ३८,रा.नळदुर्ग) याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी सुनावली आहे.


 याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दि.२१ ऑक्टोबर रोजी पहाटे ३/३० वाजता नळदुर्ग येथील एस टी स्टॅन्ड जवळील हॉटेल गीरी समोर आरोपी अजहऱ शेख याने पत्रकार आयुब शेख यांच्यावर धारदार शस्त्राने जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केला. या हल्ल्यात आयुब शेख जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून,त्यात आरोपी हातात चाकू घेऊन उभा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय षडयंत्राचा संशय जास्तच गहन झाला आहे.


जीवघेणा हल्ला-करणारा आरोपी,अजहर शेख

  नळदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीविरुद्ध भा.दं.वि.कलम १०९,११५(२), ३५२, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

स्थानिक नागरिक आणि पत्रकार संघटनांकडून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.आणि हा पत्रकारावर हल्ला नसून लोकशाहीवर हल्ला असल्याचे सर्वत्र या घटनेचा निषेध करण्यात येत आहे



या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असुन अलीकडच्या काळात वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले हे संताप जनक आणि चिंताजनक असल्याचे सर्वत्र बोलले जात असून या घटनेच्या सर्वच स्तरातून तीव्र शब्दात निषेध होतआहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा