संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
धर्मपुरी ता. माळशिरस जि. सोलापूर येथील तनवीर हसन शेख यांची MPSC मधून" इतर मागास बहुजन कल्याण विभागात" नियुक्ती झाल्याबद्दल अकलूज येथील -समीर ऑटोमोबाईल्स चे मालक जिलाणी यासुब शेख त्यांचे चिरंजीव डॉ. समीर शेख व शाहरुख शेख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
तनवीर हसन शेख यांचे प्राथमिक शिक्षण धर्मपुरी येथे झाले असून पदवीधर शिक्षण नातेपुते येथील विजयसिंह मोहिते पाटील कॉलेजमध्ये झाले
विद्ये विना मति गेली, मतिविना गति गेली, नितिविना गति गेली, गति विना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले याचा धागा धरून त्यांचे लहान बंधू -उस्मान हसन शेख यांनी मनाशी ठाम निर्धार केला की आपल्या थोरल्या बंधुला काही करून शिक्षण दिले पाहिजे म्हणून त्यांनी व्यवसाय व काबाडकष्ट करून थोरले बंधू तनवीर हसन शेख यांना शिक्षण देऊन पदवीधर बनवले आणि त्याच्या कष्टाचे चीज झाले जगात दुर्मिळ असे बंधू असतात की आपल्या बंधू साठी आपले सर्वस्व अर्पण करून योगदान देतात त्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला
याप्रसंगी बंदेनवाज शेख, उस्मान हासन शेख, सेवानिवृत्त प्रा. अबूबकर महमद शेख, यादव सर, शिंदे सर, वाघमारे सर,, राजगुरू सर, मौलाभाई बशीर शेख, रफिकभाई मुल्ला, जिब्राईल नदाफ,युन्नुस यासुब शेख, जावेद इस्माईल शेख, लतीफ शेख, जावेद याकूब शेख, आलम युनूस शेख ,हमीद भाई डांगे, आदी मान्यवर उपस्थित होते






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा