*सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9922419159*
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडी शिष्टमंडळाच्या वतीने परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी श्री. दामले यांनी पुणे येथील जे डब्लू मारियट सभागृहात विविध विषयांवर शिष्टमंडळाशी दीड तास सकारात्मक चर्चा केली.
यावेळी अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले म्हणाले, पुरोहितांच्या काही महत्वाच्या मागण्या माझ्याकडे मांडण्यात आल्या असून त्या सरकार दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. महामंडळाच्या विविध योजनाद्वारे आगामी काळात पुरोहितांना देखील त्यात लाभार्थी करुन घेण्यात येईल, मुलांच्या देशांतर्गत व परदेशातील उच्च शिक्षणासाठी कर्जरूपी अनुदान, व्याज परतावा देण्याचे ठोस आश्वासन श्री. दामले यांनी या बैठकीत दिले.
शिष्टमंडळामध्ये पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, पुरोहित आघाडी अध्यक्ष संतोष वैद्य, उपाध्यक्ष राहुल भाले शास्त्री, सरचिटणीस मनीष जोशी गुरुजी, संपर्क प्रमुख उमेश जोशी, पुरोहित महिला संपर्क प्रमुख सौ. सुरेखा ताई जोशी, श्रीपाद काशीकर, अतुल जोशी, किशोर जोशी गुरुजी उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे म्हणाले, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने
पुरोहितांना मासिक मानधन मिळावे, पुण्यात भव्य वेदभवन निर्मिती व्हावी, त्याद्वारे वैदिक शिक्षण मिळावे, पुरोहितांसाठी मोफत आरोग्य सेवा किंवा हेल्थ इन्शुरन्स देण्यात यावा, संपुर्ण महाराष्ट्रात पुरोहित गुरुजी, वेद पाठशाला, वेदभवन, शिकणारे विद्यार्थी, आध्यात्मिक, प्रवचनकार, कीर्तनकार यांचे संघटन अभियान राबविण्यात यावे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. सदर मागण्या मान्य झाल्यास त्याचा
लाभ समस्त ब्राह्मण पूरोहित वर्गाला होईल याची खात्री वाटते.
आतापर्यंत सुमारे १६० पेक्षा जास्त पुरोहितांना नियुक्ती पत्रके देण्यात आली असून या सर्वांची एक जिल्हास्तरीय बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे श्री. मंदार रेडे यांनी सांगितले.
यावेळी पुरोहितांच्या मुलांसाठी शैक्षणिक विद्यार्थी दत्तक योजना व शिष्यवृत्ती, व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज, धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविणे आदी इतर मागण्या पुरोहितांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
*जाहिरात*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा