उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
करमाळा तालुक्यातील कात्रज हे गाव उजनी जलाशयाने वेढलेलेआहे. या जलाशयामध्ये परदेशी फ्लेमिंगो यासारख्या दुर्मिळ पक्षांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. या ठिकाणी परदेशी तसेच मुंबई , पुणे , बारामती परिसरातून मोठ्या प्रमाणात पक्षी निरीक्षणासाठी उजनी जलाशयात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने लोक येत असतात. राज्य शासनाने कात्रज हे गाव पर्यटनासाठी योग्य असल्याचे घोषित केले तर मोठया प्रमाणात पर्यटक येतील. कारण बाहेर गावावरून येणाऱ्या पर्यटकांना कात्रज परिसरामध्ये कृषी पर्यटनासारखे राहण्या योग्य सोय झाली तर या भागातील बऱ्याच लोकांना रोजगार मिळू शकतो. या भागातील लोकांचा उजनी जलाशयामुळे मच्छी व्यवसाय व बोटिंग हा मुख्य व्यवसाय आहे कृषी पर्यटन मंजूर झाल्यास या व्यवसायाला चालना मिळेल. तसेच या गावांमध्ये नीलकंठेश्वराचे मंदिर अतिशय भव्यदिव्य असे आहे. त्या मंदिराची रचना उत्कृष्ट स्वरूपाची आहे.
कात्रज गावापासून थोड्या अंतरावर टाकळी या ठिकाणी पळसनाथ मंदिर असून ते मंदिर पूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे. ते मंदिर पुरातन काळातील आहे







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा