संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून अकलूज नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे.या घोषणेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून अकलूज नगर परिषदेमध्ये उभ्या केल्या जाणाऱ्या सर्व संभाव्य उमेदवारांची यादी हाती लागली असून त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सुनिता उर्फ सुवर्णा अनिल साठे या संभाव्य उमेदवार आहेत तर खालील प्रभाग नुसार संभाव्य उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १ सुवर्णा सिद्धार्थ कांबळे (सर्वसाधारण महिला), किरण रेनके,(ना.मा.प्रवर्ग ),प्रभाग २ गिरीजाबाई लोखंडे (अनुसूचित जाती महिला) किशोर सावंत,(सर्वसाधारण ) प्रभाग क्रमांक ३ रुकसाना सय्यद (सर्वसाधारण महिला) किशोर साठे (अनुसूचित जाती),प्रभाग क्रमांक ४ इरफान शेख (ना मा प्रवर्ग),शितल भोसले (सर्वसाधारण महिला) प्रभाग क्रमांक ५ मोनिका माने (ना मा प महिला) प्रभाग क्रमांक ६ रेशमा तांबोळी (ना मा प्रवर्ग महिला) सचिन भोसले (सर्वसाधारण) प्रभाग क्रमांक ७ आदित्य काकडे (सर्वसाधारण),अश्विनी आरडे (अनुसूचित जाती महिला) प्रभाग क्रमांक ८ शबाना शेख (ना मा प्रवर्ग महिला) साईराज आडगळे (सर्वसाधारण )प्रभाग क्रमांक ९ आशुतोष साठे (अनुसूचित जाती) ज्योती सकट (सर्वसाधारण महिला) प्रभाग क्रमांक १० जयश्री रणदिवे (अनुसूचित जाती महिला )अजित माने (सर्वसाधारण) प्रभाग क्रमांक ११ ज्ञानेश्वर लोखंडे (अनुसूचित जाती) पूजा गेजगे (सर्वसाधारण महिला) प्रभाग क्रमांक १२ अनिल साठे (सर्वसाधारण) मनीषा कांबळे (ना.मा प्रवर्ग महिला) प्रभाग क्रमांक १३ बंडू कांबळे (ना मा प्रवर्ग ) ज्योती एकतपुरे (सर्वसाधारण महिला) महाराष्ट्र विकास सेना पक्षाने नगराध्यक्ष एक आणि इतर २६ उमेदवार असे एकूण २७ उमेदवार जाहीर करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
सद्या तरी महाराष्ट्र विकास सेना पक्षाची एकला चलो रे ची भूमिका दिसत आहे. महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने यादी जाहीर केल्याने अकलूज नगरपरिषद निवडणुक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पूर्वी सत्ताधारी असलेल्या व विरोधी पक्षांत असलेल्या पक्षांची भूमिका गुलदस्त्यात असताना महाराष्ट्र विकास सेना पक्षाने मात्र निवडणुकीचे वातावरण तापवल्याचे दिसत आहे.सद्यातरी महाराष्ट्र विकास सेना पक्ष जोरात असल्याचे दिसून येत आहे.येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास सेना पक्ष आघाडी बरोबर जाणार की महायुती बरोबर जाणार हे निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा