उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
उमरगा तालुक्यातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान तुरोरी- कराळी ता. उमरगा जि. धाराशिव या ठिकाणी, काव्यप्रेमी महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरावरील पहिले अभंगवाणी साहित्य संमेलन रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाले आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र लोकविकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अचलबेट देवस्थान चे हभप. भिम महाराज जाधव, हभप. हरी गुरूजी लवटे महाराज, भुमीपुञ वाघ, माजी प्राचार्य व्यंकट अनिगुंठे, अनाथाची माय विद्याताई वाघ, कमलाकर भोसले, लक्ष्मण पवार, विकास राठोड, प्राचार्य विकास गायकवाड, सुधाकर झिंगाडे, सुनंदा भगत, सुमन पवार, ज्ञानेश्वर माशाळकर, कविता तांबे आदी. मान्यवर उपस्थित होते.पहिल्यांदा अचलबेट देवस्थान येथे सदगुरु काशिनाथ महाराज, सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.
यावेळी ॲड.फरहीन खान-पटेल यांनी त्याचा स्वलिखित "क्रांतीज्योती" या अभंगवाणीचे सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली फरहीन खान पटेल यांच्या उत्कृष्ट अभंग सादरीकरणा बद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून नामवंत पंढरपूरचे विठ्ठल भक्त कवी यावेळी उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा