Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

अकलूज नगर परिषदेच्या चौफेर विकासासाठी सक्षम नेतृत्व म्हणजे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील--नंदकुमार जगताप

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448



अकलूजच्या सर्वसामान्य जनतेचा आवाज उचलून धरणारे, प्रत्jयेक घटकाला सोबत घेऊन चालणारे, समतेचा आणि जनसेवेचा मजबूत पाया जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जनसेवा संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अकलूज नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी तयार असलेले मा. डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील.

अकलूज हे माझे कुटुंब… ही भावना मनात ठेवून डॉ. धवलसिंह यांनी आजवर अनेक सामान्य कुटुंबातील व्यक्तींना सत्तेतील विविध पदांवर स्थान मिळवून दिले. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सामील होणे, सर्व धर्मसमभाव जपणे आणि कोणताही भेदभाव न करता हातात हात घालून अकलूजच्या प्रगतीसाठी काम करणे, ही त्यांची कार्यपद्धती लोकांच्या हृदयात आदर निर्माण करते.

स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या शिकवणीतून वाढलेले आणि “क्या बड़ा तो दम बड़ा” हा मंत्र जपणारे डॉ. धवलसिंह यांनी अकलूज नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम, विचारधारेशी बांधील पॅनेल उभे केले आहे—

२६ नगरसेवक (राष्ट्रवादी) + १ नगराध्यक्ष असा मजबूत जननायकांचा समूह!

आज अकलूजला आधुनिक सुविधा, स्मार्ट पायाभूत सुविधा, स्वच्छ व सुंदर शहर, समाजातील सर्व घटकांचा समतोल विकास, युवकांना संधी, महिलांना आदर आणि वंचित घटकांना साथ देणारे नेतृत्व आवश्यक आहे. त्या नेतृत्वाची धुरा समर्थपणे सांभाळण्याची क्षमता डॉ. धवलसिंह यांच्या कार्यातून अकलूजकरांनी वेळोवेळी अनुभवली आहे.

अकलूज नगर परिषदेची सर्व सूत्रे एकदा त्यांच्या हाती देऊन शहराच्या चौफेर विकासासाठी त्यांचे हात बळकट करणे ही काळाची गरज आहे. कारण

जनतेची सेवा हा त्यांचा वसा,

सर्वसामान्यांच्या प्रगतीचा मार्ग हा त्यांचा ध्यास,

आणि अकलूजचा विकास हेच त्यांचे ध्येय!

अकलूजच्या सर्व नागरिकांना आज भावनिक आवाहन —

आपल्या शहराला नवी दिशा देण्यासाठी, प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी,

मा. डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाला साथ द्या.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा