सहसंपादक --डॉ. संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922419 159
पुणे पुस्तक महोत्सव, नॅशनल बुक ट्रस्ट व शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे इंदापूर मध्ये 'फिरते वाचनालय' उपक्रमातून १५०० हून जास्त युवापिढी, विद्यार्थ्यांना एक पुस्तक भेट, वाचाल तर वाचाल या उपक्रमास युवापिढी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून
वाचन संस्कृतीला नवे बळ देण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव, राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी इंदापूर ( जिल्हा पुणे ) शहरात 'फिरते वाचनालय' हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमातून १५०० हून जास्त युवापिढी, विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात आली. युवापिढी मध्ये वाचन संस्कृती वाढावी हा त्या मागचा मुख्य हेतू होता. या पुणे पुस्तक महोत्सव चे संयोजक, तसेच राष्ट्रीय पुस्तक न्यास ( केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारत सरकार ) चे विश्वस्त राजेश पांडे सर, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई सर यांच्या संकल्पनेतून व खजिनदार तुषार रंजनकर सर, विश्वस्त अरविंद गारटकर सर यांच्या विशेष मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
*ज्ञानाचा खजिना थेट वाचकांच्या भेटीला*
फिरत्या वाचनालयामध्ये साहित्य, विज्ञान, कला, इतिहास, चरित्रे तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शनपर ग्रंथ अशा विविध क्षेत्रांवरील पुस्तकांचा मोठा संग्रह उपलब्ध करून देण्यात आला होता. ज्ञानप्रेमी प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपक्रम समृद्ध करणारा आणि ज्ञानाची भूक भागवणारा अनुभव ठरला. नागरिकांनी उत्सुकतेने विविध पुस्तकांचे अवलोकन करत आपल्या आवडीच्या विषयांची माहिती घेत या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले.
*इंदापूर मध्ये शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, अल्फा बाईट व आय कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष दालन*
इंदापूर शहरातील तरुणांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांना पुस्तकांचा सहज परिचय व्हावा या उद्देशाने इंदापूर शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, अल्फा बाईट व आय कॉलेज येथे फिरत्या वाचनालयाचे एक विशेष दालन उभे करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे बारकाईने अवलोकन केले. अनेक विद्यार्थ्यांनी तर जागेवरच पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. या संपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यां मध्ये वाचनाची तीव्र प्रेरणा निर्माण झाली, ज्यामुळे परिसरात एक सकारात्मक आणि ज्ञानमय वातावरण तयार झाले.
*भेट पुस्तकाची आकर्षक योजना*
या उपक्रमाला अधिक आकर्षकता देण्यासाठी एक विशेष योजना राबविण्यात आली. प्रदर्शनास भेट देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक पुस्तक भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि त्यांना वाचनासाठी एक नवी सुरुवात मिळाली. या प्रसंगी भेट देणाऱ्या १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी व नागरिकांना मोफत पुस्तक भेट देण्यात आले.
हा फिरते वाचनालय उपक्रम समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, ज्ञानदायी आणि वाचनाची प्रेरणा देणारा ठरला. पुणे पुस्तक महोत्सव, एनबीटी आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे इंदापूर शहराच्या वाचनसंस्कृतीला खऱ्या अर्थाने नवे बळ मिळाले असून, अशा उपक्रमांची शहराला गरज असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एनबीटी चे कर्मचारी सुरेश कुमार, नरेंद्र सिंग, अनिल तिवारी, लोकेश ठाकूर, पुणे पुस्तक महोत्सव चे सहकारी हरीभाऊ आव्हाड सर, आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे सर, श्री. ना. रा. माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य संजय सोरटे सर, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख महादेव चव्हाण सर, कोपीवरची शाळा अभ्यासवर्ग प्रमुख भारत बोराटे सर, सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार, आदित्य राखुंडे, आझाद पठाण, तसेच शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यालय प्रमुख दीपक जगताप व अल्फा बाईट कॉम्प्युटर्स चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा