अनिसा सिकंदर-- दौंड,जि.पुणे
हास्याची होती हातोटी , हसवण्याचा तो जादुगार,
शब्दांच्या तलवारीने करायचा, दु:खावरच प्रहार.
व्यंगातूनही द्यायचे संदेश शब्द व्हायचे गोड गोड
सादरीकरणात चतुराई हास्याचे ते अनोखे जोड
येता ते मंचावर उजळायचे सारे सभागृह,
हसूंच्या फुलांनी सजायचे मग, मनामनांतील प्रत्येक रुक्ष गृह.
हावभावात होती जादू, संवादात मृदू धमाल,
टाळ्यांचा महासागर उठायचा—“हा कलाकारच कमाल!”
घराघरात पोहोचले हसू त्यांच्या कलेचे अमूल्य दान
मनात रुजवला त्यांनी आनंदाने प्रेमाचा निर्मळ तराण
दुःखाचे सावट एका क्षणात हलके करायचे
रुसलेल्या मनात हळुवार स्मिताचा दिवा पेटवायचे
विनोदांची प्रतिभा त्यांची, मन मोकळं करणारी झुळूक,
थकलेल्या चेहऱ्यावर फुलायची, आनंदाची सुंदर चकाक.
प्रत्येक कवितेला धार अशी, की व्यथा पळून जायची
उभा राहून प्रेक्षकांचा गजर, त्यांना सलाम करीत राहायची.
हास्याचा तो शिल्पकार, हृदयात उजळायचे दिवे,
त्यांच्या विनोदाने घडायचे जगण्याचे एक इतिहात पर्व नवे
असा हा जादूगार मिर्जाबेग, हसवण्यात ज्यांचा विजय,
मनभरून द्यायचा संदेश—"आनंदाचा सर्वोच्च अभय!"
अशा या हास्य सम्राटाला माझा आहे सलाम
हसत- हसवत जगण्याचा केला सुंदर निष्काम
अनिसा सिकंदर दौंड
९२७००५५६६६




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा