Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

साप्ताहिक "नई गस्त टाइम्स "व लोहकरे अण्णा यांचे अतुट नाते..

 श्रीपूर--बी.टी.शिवशरण



शरदराव लोहकरे अण्णा गेल्याचे वृत्त थोड्या वेळापूर्वी सोशल मीडिया वर समजले अण्णा गेल्याचे दुःख झाले अतिशय स्पष्ट स्वभाव मेहनती वृत्ती मिळून मिसळून वागण्या बोलण्याने अण्णा यांनी अनेक माणसं जोडली होती अनेक मित्र त्यांना होते अण्णा व साप्ताहिक नई गस्त टाईम्स यांचे नाते घनिष्ठ व अतुट होते लोहकरे फोटो ग्राफर अकलूज हे नाव माळशिरस तालुक्यात प्रसिद्ध होते अण्णा यांचे दोन चिरंजीव संजय व राजू लोहकरे यांना फोटो स्टुडिओ मध्ये अण्णा यांनी जम बसवून त्यांना फोटो ग्राफर ते पत्रकार म्हणून पुढे आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे डिजिटल जमाना येण्या अगोदर फोटो स्टुडिओ व फोटोग्राफी ला खूप महत्व होते अकलूज पंचक्रोशीतील अनेक महत्वाच्या घडामोडी सांस्कृतिक राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील अनेक महत्वाच्या कार्यक्रमाचे सुंदर फोटो लोहकरे बंधु यांनी काढले ते फोटो सर्वत्र पाठवण्याची पोहचवण्याची जबाबदारी अण्णा स्वतः सायकल वर जाऊन पार पाडत साप्ताहिक नई गस्त टाईम्स हे साप्ताहिक संस्थापक संपादक चांद शेख यांनी अकलूज मध्ये छत्तीस वर्षांपूर्वी सुरू केले सदर साप्ताहिक ट्रेडल मशीन म्हणजे खिळे जुळवून ब्लाक तयार केला जायचा सुरुवातीची दोन ते तीन वर्षे छापखाना म्हणजे सिकंदर प्रिंटिंग प्रेस अकलूज विजय चौकात या स्वतः चे मालकीचे प्रेस मध्ये साप्ताहिक अंक छापला जायचा त्यावेळी शहरी भागात संगणक युग सुरू झाले होते तसेच डिजिटल कॅमेरा बाजारात आला होता आधुनिक विचार व नाविन्याचा ध्यास असलेले व पुरोगामी परिवर्तनवादी विचारांचा प्रभाव असलेले संपादक चांद शेख यांनी त्यावेळी प्रेस मध्ये खिळे जुळवून ब्लाक बनवणारे एक कर्मचारी राम चव्हाण यांना पुणे येथे संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं चव्हाण यांना शेख यांनी स्व खर्चाने फी भरून रहाण्याची जेवणाची सोय करून पाठवलं होतं त्यावेळी राम चव्हाण हे काही महिने पुण्यात राहून संगणक प्रशिक्षण घेऊन अकलूज मध्ये आले तेव्हा संपादक चांद शेख यांनी दोन संगणक खरेदी केले डिजिटल कॅमेरा विकत घेतला व साप्ताहिक संगणकावर तयार करण्याची माळशिरस तालुक्यात प्रथम सुरूवात केली बातम्या दमदार फोटो आकर्षक व प्रासंगिक असल्याने नई गस्त टाईम्स चे नाव सोलापूर जिल्ह्यात झाले त्यावेळी दर आठवड्याला नियमित सातत्य टिकवून साप्ताहिक नई गस्त टाईम्स प्रकाशित होत होते साप्ताहिक मध्ये नामवंत साहित्यिक विचारवंत डॉक्टर लेखक यांचे लिखाण असलेलं दमदार सदर चालवले जायचे त्यांना त्याबद्दल ठराविक मानधन दिले जायचे तसेच तालुक्यातील जिल्ह्यातील अत्यंत निर्भिड दमदार परखड बातम्या सडेतोड दिल्या जायच्या त्यामुळे अल्पावधीतच साप्ताहिक नई गस्त टाईम्स चे नाव पश्चिम महाराष्ट्रात झाले या सर्व पार्श्वभूमीवर अकलूज येथील लोहकरे फोटो स्टुडिओ चे सर्वेसर्वा शरदराव लोहकरे अण्णा यांचे नई गस्त टाईम्स कार्यालयात दररोज येणं जाणं वाढले संजय व राजू लोहकरे हे दोन भाऊ यांचाही संपर्क वाढला त्यावेळी माळशिरस तालुक्यातील घडामोडींवर तसेच प्रासंगिक फोटो लोहकरे साप्ताहिक नई गस्त टाईम्स मध्ये प्रसिध्दी साठी देऊ लागले बघता बघता दैनिक असलेल्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होण्याच्या अगोदर अनेक दुर्मिळ घटना आठवणी प्रसंग यांवर आधारित असलेले अनेक फोटो त्यावेळी साप्ताहिक नई गस्त टाईम्स चे पहिल्या पानावर हेडिंगला आठ कालम लागायचे त्यामुळे साप्ताहिक नई गस्त टाईम्स व लोहकरे यांचे ऋणानुबंध जुळले अण्णा दिवसातून दोन वेळा गस्त कार्यालयात येऊन बसत अनेक गप्पा चर्चा संवाद व्हायचे गस्त चे नाव व चर्चा माळशिरस तालुक्यात जोरदार असायची अण्णा यांवर भरभरून बोलायचे साप्ताहिक नई गस्त टाईम्स मध्ये मी वार्ताहर उपसंपादक कार्यकारी संपादक संपादक अशी टप्प्याटप्प्याने बढती मिळाली गस्त टाईम्स चे दिवाळी अंक पुर्ण वैचारिक बौद्धिक प्रगल्भता जपणारे साहित्यिक विचारवंत यांचे कसदार व दमदार साहित्य कृतीने नटलेले प्रसिद्ध करण्यात संपादक चांद शेख यांचा सौंदर्यवादी दृष्टिकोन साहित्य मुल्य जपण्यासाठी स्थानिक लेखक विचारवंत यांना लिहण्याची संधी उपलब्ध करून दिली अनेक साप्ताहिक दिवाळी अंकात मुखपृष्ठावर नट नट्या यांचें भडक फोटो टाकत पण चांद शेख यांनी सुरूवातीपासून गस्त दिवाळी अंक मुखपृष्ठ राष्ट्रीय परंपरा राष्ट्रभक्ती महापुरुष यांना प्राधान्य दिले त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराज कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर संत कबीर छत्रपती संभाजी महाराज क्रांतीबा ज्योतीबा फुले राष्ट्रसंत गाडगे महाराज अशा थोर महापुरुष संतश्रेष्ठ विभुती यांचे विचार सामाजिक कार्य अध्यात्मिक विचार असलेले पुर्ण दिवाळी अंक काढले त्यामुळे याची दखल राज्यभरातील अनेक नामवंत संस्था संघटना यांनी घेऊन अनेक पुरस्कार सन्मान गस्त दिवाळी अंकासाठी देऊन सन्मानित केले आहे एकंदरीत गस्त ची अशी द्रुतगती वाटचाल सुरू होती आणि या सर्व पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील अनेक तसेच पंढरपूर माढा इंदापूर बार्शी परिसरातील अनेक वार्ताहर गस्त मध्ये घडले तयार झाले जवळपास आतापर्यंत सत्तर पत्रकार गस्त मध्ये घडले आहेत आता अनेक वार्ताहर जिल्हा दैनिकांत वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत प्रेस फोटोग्राफर ते वार्ताहर अशी मजल राजू लोहकरे यांची आहे संजय लोहकरे हे ही अनेक दैनिकात प्रेस फोटोग्राफर वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत अण्णा गेल्याचे दुःख झाले आहे गस्त कार्यालयात येताना अण्णा खणखणीत आवाजात शिवशरण आहेत का म्हणून आवाज देत यायचे अण्णा अकलूज मधील अनेक घडामोडी आठवणी सांगायचे अनेक बातम्या सांगायचे अत्यंत निर्मळ मनाने व आपुलकी जिव्हाळा जपणारे अण्णा शेवटपर्यंत स्पष्ट बोलायचे त्यांची दृष्टी शेवटपर्यंत चांगली होती वार्धक्याने त्यांचं निधन झाले आहे अण्णा यांचे सारखा मार्गदर्शक हितचिंतक व सहकारी आधारस्तंभ होते नई गस्त टाईम्स परिवार व लोहकरे पितापुत्र यांचे संबंध जिव्हाळ्याचे व अतुट नाते होते एकंदरीत साप्ताहिक नई गस्त टाईम्स ची सुरुवात वाटचाल घोडदौड परंपरा प्रगतीचा आलेख या सर्व वाटचालीचे अण्णा साक्षीदार होते म्हणून एवढा लेखनाचा घाट घातला आहे 

*साप्ताहिक नई गस्त टाईम्स चे वतीने शरदराव ऊर्फ लोहकरे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा