Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

अकलूजच्या भाजी मंडई मध्ये नकली नोटांचा सुळसुळाट... गोरगरीब भाजी विक्री करणाऱ्या महिलांची होत आहे फसवणूक?...

 अकलूज ---प्रतिनिधी 

     केदार लोहकरे 

  टाइम्स 45 न्यूज मराठी



अकलूजच्या भाजी मंडईत दररोज खेड्यातून गोरगरीब शेतकरी महिला  शेतातील भाजी विकण्यासाठी येत असतात पण भाजी विकत घेणारी माणसं भाजी विकत घेवून खोट्या नोटा देत आहेत.त्यामुळे अकलूजच्या या बाजारपेठ बनावट नोटांचा वापर होवू लागला आहे. विशेष म्हणजे सुशिक्षित माणसं बनावट चलनाचा वापर करीत आहेत.त्यामुळे भाजी मंडईतील शेतकरी महिलांची दिवसा ढवळ्या फसवणूक होत आहे.

             अकलूजच्या महात्मा ज्योतीबा फुले भाजी मंडईत बनावट नोटांचा वापर होवू लागल्यामुळे भाजी विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.भाजी मंडईत नवरा बायकोची जोड फिरत असतात.जिथे भाजी घेण्यासाठी लोकांची गर्दी जास्त झालेली असते तेथे ते जातात भाजी घेतात व गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा देवू निघून जातात.या प्रकारामुळे ग्रामीण भागातील भाजी विकणा-या महिला त्रस्त झाल्या आहेत.

               गेल्या महिन्यात २५/४ लवंग येथील भेळ भत्ता विक्रते बापू जाधव यांना एका सुशिक्षित महिलाने चार चाकी वाहनातून येवून त्यांच्या दुकानाततून ५० रूपयाचा भत्ता घेवून बनावट ५०० रूपयाची नोट देवून बाकी पैसे घेवून निघून गेली.त्यामुळे हे बनावट नोटाचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे.या प्रकारामुळे व्यवसायिक त्रस्त झाले आहे.सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे धुमधडाक्यात वाहू लागले आहे.त्या निवडणुकीपूर्वीच बाजार पेठेत बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा