Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५

मंगरूळ तालुका तुळजापूर येथील (बंधू व भगिनी) भाविक उमराह यात्रेसाठी रवाना

 *मंगरूळ --प्रतिनिधी* 

*चांदसाहेब  शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*




इस्लाम धर्मात पाच आद्य कर्तव्य असून प्रथम कलमा म्हणजे ईश्वर एकच असून मोहम्मद पैगंबर हे त्यांचे प्रेषित आहेत दुसरा नमाज इस्लाम धर्मातील प्रत्येक अनुयायांनी दिवसातून पाच वेळेस ईश्वराची प्रार्थना करावी तिसरा रोजा पवित्र रमजान महिन्यात महिनाभर निर्जळी उपवास करावा याला रोजा म्हणतात चौथे जकात आपल्या कमाईच्या किंवा प्राप्तीच्या अडीच टक्के दानधर्म करावा याला जकात म्हणतात व पाचवे हज म्हणजे आयुष्यात एकवेळेस तरी हज (मक्का)यात्रा करावी 




 याच इस्लाम धर्मातील सर्वात मोठ्या व पवित्र हज  यात्रेसाठी तुळजापुर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथिल दहा भाविक उमराहसाठी रविवार १६सप्टेंबर रोजी रवाना झाले असून जवळपास विस दिवस ते तेथील धार्मिक ठिकाणी राहुन प्रार्थना करतील यामध्ये सुलेमान मुर्षद फकीर, मोहम्मद तांबोळी, गुलाब मकानदार, सलीम मकानदार यांच्यासह पाच महिला व पंधरा वर्षीय एका बालिकेचाही यात समावेश आहे 



*हज उमराह यात्रेसाठी रवाना झालेल्या या भाविकांवर सोलापूर रेल्वे स्थानक येथे मुस्लीम युवकांच्या वतिने यथोचित सत्कार करण्यात आला व मानव कल्याणासाठी, भारताच्या सुरक्षिततेसाठी, दुर्धर आजाराने त्रस्त रोंगीसाठी, जे अविवाहित त्यांच्या लग्नासाठी पवित्र हज मक्का व मदिना शरीफ येथे प्रार्थना करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली**

_________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा