*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
मो:-- 9730 867 448
आगामी होणाऱ्या पंचायत समिती तुळजापूर मधील तामलवाडी गणामधून ग्रामपंचायत पिंपळा खुर्द येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सविता शंकर कदम या इच्छुक असून मागील पंचायत समिती तामलवाडी गणामधून त्यांचे पती शंकर बब्रुवान कदम यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना अपयश आले होते, कदम दांपत्य यांचा तामलवाडी गणामध्ये दांडगा संपर्क असून त्यांची भारतीय जनता पक्षाचे युवा नेते रोहन देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख आहे, सध्या त्यांनी इच्छुक असतानाच गावभेटीचा धडाका चालू केला आहे, त्यामुळे येणारी पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे आता निश्चित झाले आहे तसेच श्रीमती सविता कदम यांना तिकीट मिळणार का ? कोणाचे तिकीट कट होणार ? कदम दांपत्य यांना जनाधार आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे मग पक्षश्रेष्ठी निष्ठावंत असलेल्या श्रीमती सविता कदम यांना तारणार की डावलणार? व डावल्यावर त्यांची काय भूमिका असेल या सर्वांकडे पंचकर्षिचे लक्ष वेधले आहे.
अकलूज नगरपरिषद साठी





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा