Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

विश्वास देवकर यांना तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विरासत पुरस्कार देऊन सन्मान..

 सहसंपादक --डॉ.संदेश शहा 

  टाइम्स 45 न्यूज मराठी 

 मो:-9922 419 159



इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील   भूमिपुत्र, ज्येष्ठ संपादक डाॅ. विश्वास देवकर यांना नुकतेच मुंबई येथे विरासत पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मराठी–हिंदी संपादक पत्रकारांच्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि काशी- वाराणसी विरासत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी साहित्य व मीडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात देशभरातील १७ राज्यांतील संपादक, लेखक, अभ्यासक आणि पत्रकार सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमी, केंद्रीय शिक्षण मंत्रालय तसेच उत्तर प्रदेश शासनाचे विशेष सहकार्य या महोत्सवाला लाभले.

हिंदीतील पहिले वृत्तपत्र ‘उदन्त मार्तण्ड’ याच्या प्रकाशनाला यंदा २०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्त हिंदी पत्रकारितेच्या इतिहासातील मोलाच्या योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, कमलेश सुतार, रेखा देशपांडे, डाॅ. विश्वास देवकर, शरद वैद्य ( मरणोत्तर ) यांना विरासत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हिंदी पत्रकारितेतील भीष्माचार्य आणि कोकणचे सुपुत्र पत्रकार महर्षी कै. बाबूराव पराडकर यांचे स्मारक त्यांच्या मुळगावी म्हणजे सिंधुदुर्गात पराड येथे व्हावे अशी विनंती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी मंत्री आशिष शेलार यांना केली. 

या महोत्सवाचे उद्घाटन आसामचे महामहिम राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केले.

या दोन दिवसीय सोहळ्यात ‘भारत : साहित्य आणि मीडिया महोत्सव’ या चर्चासत्रात प्राध्यापक सोमा बन्द्योपाध्याय ( कुलपति, शिक्षक प्रशिक्षण राज्य विश्वविद्यालय कोलकाता ), इस्कॉनचे मुख्य ट्रस्टी प्रभु सूरदासजी, काशी विरासत फाउंडशनचे कार्याध्यक्ष राम मोहन पाठक, केन्द्रीय हिंदी निदेशालयाचे निदेशक हितेंद्र मिश्र, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, डॉ. अमिता दुबे आणि के. एन. श्रीवास्तव हे मान्यवर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा