सहसंपादक --डॉ.संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये झंझावाती संपर्क दौरा करून मतदारांना शहर विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
मतदारांच्या गाठी भेटी घेताना भरत शहा यांनी मतदारांशी सुसंवाद साधत त्यांना विकासाची ग्वाही दिली.
यावेळी भरत शहा म्हणाले, पुणे सोलापूर महामार्गावर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ऐतिहासिक इंदापूर शहराचा विकास करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली शहराचा नियोजनबध्द पद्धतीने विकास केला जाईल. आम्हाला जी पदे मिळाली होती, त्या पदांचा आम्ही योग्य सन्मान वाढवला आहे. आम्ही प्रतिष्ठेसाठी काम करत नसून शहर व सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही टीके ऐवजी विकास
ला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
यावेळी नगरपरिषदेचे माजी गटनेते गजानन गवळी, माजी पक्ष नेते पोपट शिंदे, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, बंडा चव्हाण, श्रीनिवास माने, प्रदीप आवटे, अमोल माने, किशोर बागल, मनोज राजगुरू, ओंकार राऊत, बसवेश्वर पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला मान्यवर उपस्थित होत्या.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा