Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

डॉ.संपदा मुंडे ला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील डॉक्टरांचा काम बंद आंदोलन आरोग्यसेवा कोलमाडण्याची शक्यता?..

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:--  9730 867 448*

साताऱ्यातील फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. ज्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात त्यांनी उल्लेख केलेल्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्यरित्या केला जात नसल्याचा आरोप डॉक्टरांकडून केला जात आहे. याप्रकरणी आता फलटणमधील डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर राज्यभरात डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून काम बंद आंदोलन केलं जात आहे.

तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून केली जात आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात रेसिडेंट डॉक्टर आणि एमडी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ‘नो सेफ्टी, नो सर्विस’ या आशयाचे पोस्टर आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी हातामध्ये घेतले आहे. नायर मार्ट संघटनेकडून आंदोलन सुरू असून डॉ. मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका घेण्यात आली आहे. 

काय आहेत मागण्या?

या प्रकरणात रिटायर्ड न्यायाधीश आणि महिला सदस्याचा समावेश करत एसआयटी नेमावी, अशी डॉक्टरांची मागणी आहे. संपदा मुंडेच्या कुटुंबाला 5 कोटींची मदत, जलदगती कोर्टात सुनावणी आणि डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करावा, अशा मागण्याही डॉक्टरांकडून करण्यात आले आहेत.

याशिवाय छत्रपती संभाजीनगर घाटीतील मार्ड या संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मार्ड संघटनेचे सर्व डॉक्टर आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, आंदोलन सुरू असल्याने रुग्णालय परिसरात ओपीडी सेवा ठप्प झाली आहे. फक्त इमर्जन्सी विभाग सुरू असून त्यामुळे रुग्णांना मोठा फटका बसत आहे. आज फक्त ओपीडी सेवा बंद, पण न्याय न मिळाल्यास उद्या पासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करू असा इशारा डॉक्टरांनी सरकारला दिला आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा